IMPIMP

Anti Corruption Bureau Kolhapur | 25 लाखाच्या लाच प्रकरणी 2 ‘वजनदार’ पोलिस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; संपुर्ण पोलिस दलात प्रचंड खळबळ

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Anti Corruption Bureau Kolhapur | कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) स्थानिक गुन्हे शाखेतील
दोन पोलीस कॉन्स्टेबल (Kolhapur Police Local Crime Branch) 25 लाखाच्या लाचप्रकरणी एसीबीच्या (Anti Corruption Bureau Kolhapur)
जाळ्यात (Kolhapur Crime) सापडले आहे. यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक करून मोक्का
अंतर्गत कारवाईची धमकी देऊन 25 लाखाच्या लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून 10 लाखांची लाच उकळणारे विजय केरबा कारंडे (Vijay
Kerba Karande) (वय 50, रा.उचगाव, ता.करवीर) व किरण धोंडीराम गावडे (Kiran Dhondiram Gawde) (वय 37, रा. केदारनगर मोरेवाडी,
ता.करवीर) यांना अटक (Arrested) करण्यात आले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (ACB Kolhapur) शुक्रवारी केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत माहिती अशी की, कोल्हापूर मधील एका वकिलाच्या मुलाचा मोटरकार, टुव्हिलर वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. वकीलाच्या मुलाने 8 दिवसांपूर्वी पनवेल (Panvel) येथून जुन्या वापरातील स्पोर्ट्स बाईक खरेदी करून कोल्हापुरात आणले होते. टुव्हिलर भंगारमध्ये काढण्यासाठी त्यांनी रितसर परवाने घेतले होते. पण, विजय कारंडे (Vijay Karande) व किरण गावडे (Kiran Gawde) या दोघांनी वकील मुलाला गाठले. मुंबई-पुण्यातून दुचाकी चोरून आणून कोल्हापुरात विकतो काय असं म्हणत मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात तुला अटक करून तुझ्यावर मोका लावतो, तुझी सार्वत्रिक बदनामी करतो अशी धमकी दिली. तसेच हे प्रकरण थांबवायचे असेल तर 25 लाख रुपये द्यावे लागतील नाहीतर कारवाई करेन अशी धमकी दिली. (Anti Corruption Bureau Kolhapur)

दरम्यान, विजय कारंडे व किरण गावडे हे पोलीस संबंधित तरुणाला 18-19 जानेवारी पोलीस मुख्यालयात चौकशीसाठी घेऊन गेले होते. 25 लाख दिल्याशिवाय सुटका होणार नाही, अस म्हटल्याने युवक घाबरला. शेवटी त्याने 10 लाख रूपये देण्यास मान्य केले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (Anti Corruption Bureau Kolhapur) तक्रार दिली. या तक्रारीवरून आज (शुक्रवारी) सकाळी एसीबीच्या पथकाने पोलीस मुख्यालय परिसरातील अलंकार हॉलजवळ पडताळणी केली असता विजय कारंडे व किरण गावडे या दोघांनी पुन्हा पैशाची मागणी केली. नंतर दुपारच्या सुमारास पोलीस मुख्यालयाच्या पिछाडीला वकिल मुलाकडून 10 लाख घेऊन विजय कारंडे व किरण गावडे यांनी स्वतःच्या गाडीच्या डिकीत ठेवली. त्याक्षणी एसीबीने त्या दोघांना अटक (Arrested) केली व रोकड ताब्यात घेतली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, संशयित कॉन्स्टेबल विरुद्ध शाहुपुरी पोलीस ठाण्यात (Shahupuri Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे (SP Rajesh Bansode), अप्पर अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav), अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgauda) आणि उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत (DySP Adinath Budhwant) यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title : Anti Corruption Bureau Kolhapur | 25 lakh bribery cases Anti Corruption Bureau Kolhapur Police Local Crime Branch Police Vijay Kerba Karande and Kiran Dhondiram Gawde arrested Pune Division ACB Kolhapur Unit

हे देखील वाचा :

Sharad Pawar | खा. अमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसे भूमिकेवरुन शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Arthur Road Jail | मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात आर्थर रोड कारागृहात असलेल्या कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

Shehnaaz Gill | शहनाज गिलच्या डायलॉगवर यशराजने पुन्हा बनवले गाणे; ‘बोरिंग डे’ ऐकून लोकांना लागलं पुन्हा वेड

Related Posts