IMPIMP

Anti Corruption Bureau Nanded | दोन वेळा वाचला पण तिसऱ्यांदा ‘लाचखोर’ तलाठी 10 हजार घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

हदगाव (नांदेड): सरकारसत्ता ऑनलाइन  Anti Corruption Bureau Nanded | एका शेतकऱ्याच्या नावे असेलेल्या दोन हेक्टर ५३ आर पैकी एक हेक्टर जमीन पत्नीच्या नावे करण्यासाठी १२ हजाराची लाच तलाठ्याने मागितली. मात्र त्याने याप्रकरणी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर सापळा रचला पण दोन्ही वेळेला तलाठी वाचला. पण तिसऱ्यावेळी मात्र १० हजारांची लाच घेताना रंगेहाथ (Anti Corruption Bureau Nanded) पकडले. संजय गजानन मेहुणकर (Sanjay Gajanan Mehunkar) असे या तलाठयाचे नाव असून बुधवारी सायंकाळी ही कारवाई केली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तळणी येथील एका शेतकऱ्याला स्वतःच्या नावावर असलेली दोन हेक्टर ५३ आर जमिनीपैकी एक हेक्टर जमीन पत्नीच्या नावे करायची होती. त्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे त्या शेतकऱ्याने तलाठी संजय मेहुणकरकडे दिली. त्याने यासाठी १५ हजार रुपयेची मागणी केली. तडजोडीअंती १२ हजार रुपये लाच ठरली. १० हजार सुरुवातीला आणि २ हजार काम पूर्ण झाल्यावर देण्याचे ठरले. त्यानंतर शेतकऱ्याने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड (Anti Corruption Bureau Nanded) येथे तक्रार दिली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीची शहानिशा करून पोलीस निरीक्षक व्ही.एस.माने यांच्या पथकाने बुधवारी सापळा लावला.
सुरुवातीला तलाठ्याने १२ वाजता भेटण्यास सांगितले.
त्यानंतर १. वाजता भेटू असे शेतकऱ्याला सांगितले.
पण दोन्ही वेळेला तलाठी आलाच नाही.
दरम्यान, मेहूणकरने सायंकाळी ५:४५ वाजता हदगाव-तामसा रस्त्यावरील तलाठ्यांच्या खासगी कार्यालयात बोलावले.
त्यानुसार संबंधित शेतकरी १० हजाराची लाच घेऊन तेथे गेला.
मेहुणकर पैसे घेताच दबा धरून बसलेल्या पथकाने तलाठ्याला रंगेहाथ पकडले.

Web Title: Anti Corruption Bureau Nanded | twice time changed stuck third time talathi who took bribe rs 10000 was caught red handed by acb nanded

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | ‘राष्ट्रवादी बिनभरवशाची, काँग्रेसमध्ये दरोडेखोर नाहीत’

Sangli Crime | सोन्याचे दागिने पळवणाऱ्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश; सांगली गुन्हे शाखेची कारवाई

Ahmednagar Crime | ST बसमध्येच गळफास घेत चालकाची आत्महत्या; अहमदनगरमध्ये खळबळ

Related Posts