IMPIMP

Appasaheb Deshmukh Money Laundering Case | मनी लाँड्रिंग प्रकरणी श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशनचे माजी खासदार देशमुख यांना अटक

by nagesh
Maharashtra TET Scam | enforcement directorate ed registers money laundering case in maharashtra tet scam case pune police

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Appasaheb Deshmukh Money Laundering Case | वैद्यकीय प्रवेश देण्याचे आमिष दाखवून सुमारे 350 विद्यार्थ्यांकडून रोखीने 29 कोटी घेतल्याप्रकरणी कोल्हापूर (Kolhapur) स्थित श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे (Shri Chhatrapati Shivaji Education Society, Kolhapur) माजी खजिनदार अप्पासाहेब रामचंद्र देशमुख (Appasaheb Ramchandra Deshmukh) यांना मनी लाँड्रिंगच्या (Appasaheb Deshmukh Money Laundering Case) आरोपाखाली सक्तवसुली संचालनालयने (Enforcement Directorate) अटक (Arrest) केली. शुक्रवारी ही कारवाई केल्यानंतर ईडीने त्यांना विशेष न्यायालयात (Special Court) हजर केले असता 24 जूनपर्यंत ईडी कोठडी दिली आहे. दरम्यान, अप्पासाहेब देशमुख यांचे बंधू व संस्थेचे माजी अध्यक्ष महादेव देशमुख (Mahadev Deshmukh) यांनाही मे महिन्यात अटक केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, अप्पासाहेब देशमुख हे 2011 ते 2016 या कालावधीमध्ये श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार होते. त्या काळात त्यांची त्यांचे बंधू संस्थेचे माजी अध्यक्ष महादेव देशमुख यांच्याशी संगनमत करून संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (Institute of Medical Sciences) या वैद्यकीय महाविद्यालयात (Medical College) 350 विद्यार्थ्यांना प्रवेशाचे आमिष दाखवत त्यांच्याकडून 29 कोटी रुपये रोखीने गोळा केले.

पैसे घेतले मात्र त्यांना संस्थेत प्रवेश दिला नव्हता. हे पैसे कोठून आले हे समजू नये म्हणूनच त्यांनी विद्यार्थ्यांकडून रोखीने पैसे घेतले होते. कालांतराने अप्पासाहेब देशमुख यांनी हे पैसे स्वतःच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यात जमा केले. असा ठपका ईडीने (ED) ठेवला आहे. सातारा जिल्ह्यातील वडूज पोलीस ठाण्यात (Vaduj Police Station) याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. त्यानंतर फसवणुकीची व्याप्ती वाढल्याने हा तपास ईडीकडे देण्यात आला.

प्रवेशाविना पैसे घेतले

2012-13 आणि सन 2013-14 या दोन वर्षांसाठी श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीला वैद्यकीय महाविद्यालय चालविण्याची अनुमती मिळाली होती.
त्यासाठी 100 जागांची मान्यता देण्यात आली होती. सरकारी कोट्यातून 85 तर 15 जागा व्यवस्थापन कोट्यातून भरण्यास परवानगी दिली होती.
त्यानंतर 2014 ला संस्थेला वैद्यकीय महाविद्यालय चालवण्यास मान्यता दिली नव्हती.
मात्रा तरीही प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून कोट्यवधी रुपये उकळून (Appasaheb Deshmukh Money Laundering Case) त्यांना प्रवेशही न दिल्यामुळे हा प्रकार समोर आला.

Web Title :- Appasaheb Deshmukh Money Laundering Case | former treasurer of shri chhatrapati shivaji education kolhapur former mp deshmukh arrested

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :


Related Posts