IMPIMP

Aurangabad Crime | 20 वर्षाच्या तरुणीच्या डोक्यात रॉडने वार करुन गळा आवळून खून, मित्र फरार

by nagesh
Aurangabad Crime | murder of 20 years old girl friend abscond after murder aurangabad police seach is going on

औरंगाबाद : सरकारसत्ता  ऑनलाइन – Aurangabad Crime | औरंगाबाद जिल्ह्यातील नारेगावातील राजेंद्रनगरमध्ये एका 20 वर्षाच्या तरुणीचा डोक्यात रॉडने वार करत, गळा आवळून खून (Young Girl Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (दि.18) दुपारी अडीचच्या सुमारास घडली असून सायंकाळी साडेपाच वाजता हा प्रकार समोर आली आहे. दरम्यान, मृत तरुणीचा मित्र मोबाईल बंद करुन फरार झाला असून पोलिसांनी त्याच्यावर संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात (MIDC CIDCO Police Station) गुन्हा (FIR) दाखल (Aurangabad Crime) करण्यात आला आहे. (Aurangabad Police)

रेणुका देवीदास ढेपे Renuka Devidas Dhepe (वय-20 रा. ब्रिजवाडी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिच्या भावाच्या तक्रारीवरुन संशयित मित्र शंकर हागवणे Shankar Hagwane (वय-25 रा. वाशीम) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे (Police Inspector Vitthal Pote) यांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर हागवणे हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. तो 21 मार्चपासून नारेगावातील (Naregaon) राजेंद्रनगर (Rajendranagar) येथील वसंतराव बनगाळे यांच्या घरात राहत होता. हागवणे त्याच्यासोबत त्याचे इतर तीन मित्र तिथेच राहतात. रेणुका ढेपे ही शंकरची मैत्रीण होती. ती अधूनमधून त्याला भेटण्यासाठी खोलीवर जात होती. बुधवारी दुपारी देखील ती शंकरला भेटण्यासाठी गेली होती. ती आल्यावर इतर मित्र आपआपल्या कामाला गेले होते. त्यानंतर दोघेजण खोलीत होते. (Aurangabad Crime)

सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शंकरचे मित्र खोलीवर आले. त्यांनी खोलीचा दरवाजा उघडला असता रेणुका रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यांनी तात्काळ घर मालकांना याची माहिती दिली. त्यानंतर हा प्रकार एमआयडीसी सिडको पोलिसांना कळवण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह घाटी रुग्णालयात पाठवला. घटनास्थळाला सहायक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ (ACP Nishikant Bhujbal), विशाल ढुमे (Vishal Dhume), पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी चौरे (API Shivaji Chaure), गुन्हे शाखेचे (Crime Branch) पोलीस उपनिरीक्षक अमोल म्हस्के (PSI Amol Mhaske) यांनी भेट दिली.

संशयित आरोपी फरार

मृत रेणुका आणि संशयित आरोपी शंकर यांच्यात मागील काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती. रेणुका शंकरच्या खोलीवर येत होती. गल्लीतील नागरिकांनी आणि शंकरच्या मित्रांनी ही माहिती पोलिसांना दिली. यावरून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते हे स्पष्ट झाले. पोलिसांनी शंकरचा शोध सुरु केला आहे. परंतु शंकर फोन बंद करुन फरार झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव (Police Inspector Avinash Aghav) यांनी दिली. आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतरच नेमका प्रकार काय आहे हे समजेल असे पोलीस निरीक्षक पोटे यांनी सांगितले.

Web Title : Aurangabad Crime | murder of 20 years old girl friend
abscond after murder aurangabad police seach is going on

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांच्यावर गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

Ajit Pawar on Shivsena | अजित पवारांचा शिवसेनेला टोला; म्हणाले – ‘सरकार चालवताना भांड्याला भांडे लागतेच पण..’

Pankaja Munde On Ketaki Chitale Topic | केतकी चितळे वादग्रस्त पोस्ट प्रकरणी पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘पवार साहेबांनी…’

Related Posts