IMPIMP

Avinash Bhosale Arrest Case | अविनाश भोसले अटक प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश; CBI नं मागितली होती 10 दिवसांची कोठडी

by nagesh
Avinash Bhosale | Pune based builder avinash bhosale send 10 days cbi custody by court

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन – Avinash Bhosale Arrest Case | पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांना काल सीबीआयने (CBI) अटक केली. येस बँक – डीएचएफएल घोटाळा प्रकरणात (Yes Bank – DHFL Scam Case) अविनाश भोसले यांच्यावर ही कारवाई (Avinash Bhosale Arrest Case) करण्यात आली आहे. यापूर्वी सीबीआयने मुंबई (Mumbai), पुण्यात (Pune) छापे टाकले होते. याप्रकरणी सीबीआयचा तपास सुरू होता. अविनाश भोसले यांना आज मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court) हजर करण्यात आले. त्यावेळी सीबीआयकडून भोसले यांची 10 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, मुंबई सत्र न्यायालयाने अविनाश भोसले यांना नजर कैदेत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

अविनाश भोसले यांच्यावर करण्यात आलेली कारवाई बेकायदेशीर (Illegal) असल्याचा दावा भोसले यांच्या वकिलांनी करुन रिमांडला विरोध केला. भोसले यांना वरळी येथील घरामध्ये किंवा सेंट रेजिस पंचतारांकित हॉटेलमध्ये (St. Regis Five-Star Hotel) नजरकैदेत ठेवण्यात यावे अशी मागणी भोसले यांच्या वकिलांनी न्यायालयात केली. (Avinash Bhosale Arrest Case)

यावर सीबीआयकडून भोसलेंना बीकेसीच्या गेस्ट हाऊसमध्ये (BKC Guest House) ठेवत त्यांना सर्व जेवण, मेडिकल सुविधा देण्याची तयारी दर्शवली.
तसेच 28 आणि 29 मे रोजी एक तास 5 ते 6 या वेळेत त्यांचे वकिल विजय अग्रवाल (Advocate Vijay Agarwal) आणि धवल मेहता (Dhawal Mehta) यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.
30 मे रोजी त्यांना सकाळी आकरा वाजता कोर्टात घेऊन यावं असेही कोर्टाने सांगितले.
भोसले यांच्या रिमांडला विरोध करत दाखल केलेल्या अर्जाला उत्तर देण्यासाठी सोमवार पर्यंत वेळ देण्यात आला आहे.

Web Title :- Avinash Bhosale Arrest Case | Pune based builder avinash bhosale arrest case directions given by mumbai sessions court

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Diabetes Diet | मधुमेहाच्या रुग्णांनी हे ‘4’ पदार्थ खाल्यास नाही राहणार Blood Sugar Level ची चिंता, जाणून घ्या

NCP Chief Sharad Pawar | …म्हणून शरद पवार यांनी दगडूशेठ मंदिरात न जाता बाहेरूनच हात जोडले

PM Crop Insurance Scheme | खूशखबर ! महाराष्ट्रातील जवळपास 9.5 लाख शेतकऱ्यांना पीएम पीकविमा योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपये मिळणार

Related Posts