IMPIMP

Beed Crime | 30 वर्षीय ‘कल्याणकारी’ विवाहीत महिलेचं युवकाशी जुळलं सूत, नवर्‍याला ‘लफडं’ समजलं अन् भलतंच घडलं

by nagesh
Pune Crime News | Warje Malwadi Police Station - Ex-BJP office-bearer commits suicide by hanging himself

बीड : सरकारसत्ता ऑनलाइन – Beed Crime | बीड जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना (Beed Crime) समोर आली आहे. एका तीस वर्षीय विवाहित महिलेबरोबर एका युवकाची फेसबुकद्वारे (Facebook) ओळख झाली. त्यानंतर दोघांचेही प्रेमसंबंध जुळले. विवाहित महिला युवकाच्या घरी गेली. दरम्यान विवाहितेच्या पतीने मात्र तिला फाेन करुन गुन्‍हा दाखल करण्याचा इशारा दिल्याने त्या जोडप्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) करण्‍याचं ठरवलं. मात्र त्यावेळी दोरी तुटल्याने विवाहित महिला वाचली आणि संबधित युवकाचा मृत्यु (Died) झाला. जयपाल लक्ष्मण वाव्हळ (Jaipal Laxman Vavhal) ( वय 27, रा. भेंड बुद्रुक, ता. गेवराई ) असं मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत माहिती अशी, संबधित घटना सोमवार (17 जानेवारी) रोजी गेवराई तालुक्यातील भेंड बुद्रुक याठिकाणी घडली.
मृत जयपाल वाव्हळ याचे कल्याण येथील एका 30 वर्षीय विवाहित महिलेसोबत फेसबुकवर प्रेमसंबंध जुळले.
2 दिवसांपूर्वीच ही महिला भेंड येथे आली. 16 रोजी संबंधित महिलेला तिच्‍या पतीने फोन केला.
दाेघांवर गुन्हा दाखल करेन, असा इशारा दिला. भीतीपोटी सोमवार (17 जानेवारी) रोजी पहाटे घरातील आड्याला या प्रेमी जोडप्याने गळफास घेतला. यावेळी दोर तुटल्‍याने विवाहित महिला वाचली. मात्र जयपाल याचा मृत्यु झाला आहे. (Beed Crime)

दरम्यान, याप्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात (Talwada Police Station) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रताप नवघरे (API Pratap Navghare) यांच्या मार्गदर्शनाखाली एम. डी. कुवारे (M. D. Kuvare) हे तपास करीत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Beed Crime | 30 years old woman fall in love of youth youth suicide in bhend budruk at gevrai of beed district

हे देखील वाचा :

Hingoli Crime | 13 वर्षाच्या मुलीला पळवून नेत केला अत्याचार, आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी

Pune Lohegaon Airport | कोरोनाची संख्या वाढली, प्रवासी संख्या घटली ! पुण्यातील दररोज उड्डाण होणारे 20 ते 25 विमाने रद्द

Kirit Somaiya | ‘रश्मी ठाकरेंना राबडी देवी म्हणणाऱ्यांना लगेच जेलमध्ये टाकलं, मग नाना पटोलेंवर कारवाई का नाही?’

Related Posts