IMPIMP

Beed Crime | आलिशान कारने घेतला युवकाचा जीव; बीडच्या बड्या नेत्याच्या मुलाचं नाव समोर

by nagesh
Pune News | An engineer from Pune wakad was killed and his wife and son were seriously injured in an accident near Kameri islampur

परळी : सरकारसत्ता ऑनलाइन –  Beed Crime | एका मद्यधुंद तरुणाने आपल्या आलिशान कारने रोडवरून जाणाऱ्या एका मासूम युवकाचा जीव घेतला आहे. ही धक्कादायक घटना बीड (Beed) जिल्ह्याच्या परळी (Parli) तालुक्यातील तळेगाव परिसरात घडली आहे. आरोपीनं भरधाव कार चालवत दुचाकीवरून जाणाऱ्या एका युवकाला जोरदार टक्कर (Accident) दिलीय. या दुर्दैवी अपघातात संबंधित दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू (death) झाला आहे. दरम्यान, युवकाच्या दुचाकीला (Two-wheeler) धडक देणारी अलिशान कार ही परळी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षाच्या मुलाची असल्याची चर्चा सुरु आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

प्रमोद भगवान तांदळे (Pramod Bhagwan Tandale) असं मृत युवकाचे नाव आहे.
हा युवक आपल्या दुचाकीवरून जात होता. यावेळी किंगमेकर नाव लिहिलेली आलिशान करणे भरधाव येत प्रमोदच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे प्रमोद दुचाकीसोबत बराच अंतर दूर पडला गेला.
या घटनेत प्रमोदचा जागीच मृत्यू झाला. यावरून परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मृत तरुण प्रमोद तांदळे यांच्या नातेवाईकांनी परळी ग्रामीण पोलीस ठाणे (Parli Rural Police Station) परिसरात ठिय्या आंदोलन केलं आहे.
आंदोलन कर्त्यांनी संबंधित कारचालकावर तात्काळ कारवाई (Action) करत आम्हाला न्याय मिळवून देण्याची मागणी केलीय.
परळी पोलीस संबंधित बड्या राजकीय नेत्याच्या मुलावर गुन्हा दाखल (FIR) करतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

दरम्यान, परळी नगर परिषदेच्या (Municipal Council) माजी नगराध्यक्षानं काही दिवसांपूर्वी आपल्या मुलाच्या वाढदिवसाला ही आलिशान कार भेट म्हणून दिली होती.
आपल्या मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी त्यांनी लाखो रुपये खर्च केले होती.
मात्र, मुलानं तीच कार दारू पिऊन चालवत एका निष्पाप तरुणाचा जीव घेतला आहे.
या घटनेनंतर नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

Web Title : Beed Crime | car hit bike in parali accident done by big leader son in beed

हे देखील वाचा :

3rd Wave Of Corona | ‘कोल्हापूर जिल्ह्यात 15 ऑक्टोबर पासून तिसरी लाट तीव्र होण्याची भीती?’, ‘या’ मंत्र्याने केले मोठे वक्तव्य

Mutual Funds | ते चार म्यूच्युअल फंड्स जे कमाईसह टॅक्स सेव्हिंगमध्ये सुद्धा करतात मदत, जाणून घ्या

Rain in Maharashtra | राज्यात आगामी 3 दिवस पाऊस बरसणार; मुंबईसह पुण्यात मुसळधार

Related Posts