IMPIMP

Beed Crime | बीडमध्ये हवाला रॅकेटचा पर्दाफाश; 51 लाखांसह तिघे ताब्यात

by nagesh
Beed Crime | hawala racket exposed in beed unaccounted amount of rs 51 lakh seized Beed Crime News

बीड : सरकारसत्ता ऑनलाइन Beed Crime | शहरात तीन ठिकाणी धाड टाकून हवाला रॅकेटचा (Hawala Racket) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. रविवारी सहायक अधीक्षक पंकज कुमावत (IPS Pankaj Kumawat) यांच्या पथकाने ही कारवाई केली असून सुमारे ५१ लाखाची बेहिशोबी रोकड हस्तगत केली आहे तर तीन जणांना ताब्यात घेतले आहे. मयूर विठ्ठल बोबडे, हरीश रतीलाल पटेल, सूरज पांडुरंग घाडगे अशी त्यांची नावे आहेत. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. (Beed Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरात विविध ठिकाणी आयकर चुकवून टोकन पध्दतीने पैशांची देवाणघेवाण सुरू असल्याची माहिती केजचे सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी शिवाजीनगर ठाण्याचे उपनिरीक्षक बाळराजे दराडे, हवालदार बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, दिलीप गित्ते, राजू वंजारे, पो. ना. विष्णू चव्हाण, रवी आघाव, संजय टुले, दीपक जावळे, अविनाश सानप आदींचे पथक तयार केले या पथकाने रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास शहरातील कबाडगल्लीतील न्यू इंडिया अंगडिया, जालना रोडवरील आर क्रांती ट्रेडर्स व सिध्दीविनायक कॉम्प्लेक्ससमोरील एका ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी त्यांना अनुक्रमे ३५ लाख ७९ हजार रुपये, ९ लाख रुपये, ६ लाख ४१ हजार रुपये अशी एकूण ५१ लाख २६ हजार रुपयांची बेकायदेशीर रोकड आढळून आली.याबाबत तिन्ही ठिकाणच्या व्यवस्थापकांकडे विचारपूस केली तेव्हा त्यांना हिशोब देता आला नाही. पोलिसांनी रोकड हस्तगत करत तिघांनाही ताब्यात घेतले. कारवाईत पैसे मोजण्याचे यंत्र, मोबाइल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. (Beed Crime)

आयकर विभागाला देणार पत्र
ताब्यात घेण्यात आलेल्यांकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत. हस्तगत केलेल्या रकमेबाबत तिघांना खुलासा करता आला नाही. दरम्यान, तपासात हवाला रॅकेट कसे चालायचे, किती रुपयांचा व्यवहार व्हायचा , कमिशन किती मिळायचे हे स्पष्ट होईलच पण या पैशासंदर्भात पोलीस आयकर विभागाला (Income Tax Department) पत्र देणार असून त्यानंतर आयकर विभाग पुढील कार्यवाही करणार आहे. या कारवाईमुळे हवाला रॅकेटचे इतर ठिकाणचे कनेक्शन देखील समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Beed Crime | hawala racket exposed in beed unaccounted amount of rs 51 lakh seized Beed Crime News

हे देखील वाचा :

LPG Gas Price Hike | एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, 7 मार्चनंतर घरगुती गॅससाठी जादा पैसे मोजावे लागणार?

Pune Crime | पुण्यात अडीच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार, खून प्रकरणी संजय काटकरला फाशीची शिक्षा; पुणे कोर्टाने सुनावली शिक्षा

Pune Crime | 37 लाखाच्या फसवणूक प्रकरणी ‘इंडिया होम लोन’च्या 3 अधिकार्‍यांविरूध्द पुण्यात गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

Related Posts