IMPIMP

Bhandara Crime | दुर्देवी ! 2 चिमुकल्या बहीण-भावांचा खेळता-खेळता तलावात पडून मृत्यू

by nagesh
Pune Crime | Young woman dies after tripping in mine; The incident at Katraj, a case has been registered against both

भंडारा : सरकारसत्ता ऑनलाइन Bhandara Crime | गोंदिया (Gondia) जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील परसवाडा येथे बहीण-भावांचा तलावात बुडुन दुर्देवी मृत्यु (Died) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे बहीण-भाऊ खेळत होते, त्यावेळी सायकलचे टायर खेळता-खेळता गावालगत असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या मागील तलावाकडे गेले. यावेळी ते तलावात पडले. दोघेही लहान असल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू (Bhandara Crime) झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Death by drowning in lake water)

याबाबत माहिती अशी, घरातील सर्व मंडळी धान कापणीसाठी शेतावर गेले होते. घरी आजोबा असताना मुले अंगणात खेळत होती. खेळता-खेळता दोन्ही चुलत बहीण-भाऊ गावालगत असलेल्या तलावाकडे गेले. सायकलच्या टायर खेळत होते. उतार भाग असल्यामुळे टायर सरळ तलावाच्या पाण्यात गेले. टायर काढण्यासाठी मुलगी पाण्यात गेली. तिच्या पाठोपाठ मुलगाही पाण्यात गेला. यावेळी दोन्ही मुले तलावाच्या पाण्यात (Bhandara Crime) बुडाली, असे माणगावचे पोलीस निरीक्षक अश्‍वनाथ खेडकर (PI Ashwanath Khedkar) यांनी सांगितलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

दरम्यान, दोन्ही मुले घरी नसल्यामुळे कुटुंबातील लोकांनी इकडे-तिकडे विचारफूस केली. गावातील एका व्यक्तीने सांगितले की, ते तलावाकडे जाताना दिसले. त्यामुळे तलावाकडे जाऊन शोध घेतला. तलावाजवळ बालके खेळत असलेले टायर दिसले. त्यामुळे चिमुकल्यांची ओळख पटली. त्यानंतर दोन्ही बालकांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. एकच परिवारातील 2 चिमुकल्यांचा मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली (Bhandara Crime) आहे.

Web Title : Bhandara Crime | two children drowned in lake at gondia

हे देखील वाचा :

Breast Cancer | पुरुषांमध्येही ‘ब्रेस्ट कॅन्सर’ची समस्या निर्माण होऊ शकते; काय आहेत लक्षणे?, जाणून घ्या

Jalgaon Crime | एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात थांबवून अल्पवयीन मुलीशी केले अश्लील कृत्य

Pune Airport | 15 दिवसांनंतर पुण्याच्या लोहगाव विमानतळावरून विमानसेवा सुरू

Related Posts