IMPIMP

Buldhana Accident | देवदर्शनासाठी जाणार्‍या भाविकांवर घाला ; ट्रकची जीपला धडक, 5 भाविक जागीच ठार, 7 गंभीर जखमी

by nagesh
Buldhana Accident | buldhana accident news 5 killed in jeep car accident while 7 are injured

बुलढाणा : सरकारसत्ता ऑनलाइनBuldhana Accident | शेगाव (Shegaon) येथे संत गजानन महाराजांच्या (Sant Gajanan Maharaj)
दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या जीपला ट्रकने दिलेल्या (Jeep – Truck Accident) धडकेमुळे झालेल्या अपघातात ५ जण जागीच ठार (Death) झाले असून ७ जण गंभीर जखमी (Injured) झाले आहेत (Buldhana Accident).

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ही घटना देऊळगाव राजा शहराबाहेरील वळणावर सोमवारी पहाटे साडेपाच वाजता घडली. जालना जिल्ह्यातील (Jalna District) अंबड (Ambad) तालुक्यातील रोहनवाडी (Rohanwadi) येथील भाविक जीपमधून शेगावला जात होते.

रोहनवाडी येथील भाविक बोलेरो जीपमधून (Bolero Jeep) शेगावकडे जात होते. देऊळगाव राजा (Deulgaon Raja) शहराबाहेरील बायपासच्या (Bypass) वळणावर समोरुन येणार्‍या मालट्रकने या जीपला जोरात धडक (Buldhana Accident) दिली. ही धडक इतकी जोरात होती की, त्यात जीपमधील ५ जणांचा जागीच मृत्यु झाला. जीपमधील ७ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जालना येथील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. जखमींना अगोदर ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) पाठविण्यात आले होते. अपघातात मृत्यु पावलेल्यांची ओळख पटविण्यात येत आहे.

Web Title :- Buldhana Accident | buldhana accident news 5 killed in jeep car accident while 7 are injured

हे देखील वाचा :

MBBS Exam In Latur Medical College | एमबीबीएसचा पेपर केला रद्द ! महाविद्यालयाचा भोंगळ कारभार, मुळ पेपरच दिला सराव परीक्षेला, 4 महिन्यापूर्वीच फुटला पेपर

Nandurbar Police | मुलाने महिलेला पळवल्याच्या रागातून वडिलांना पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, 5 आरोपींना नंदुरबार पोलिसांनी केली अटक

HSC Exam Paper Leak Case | आणखी एक पेपरफुटी प्रकरण उघड ! बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फोडणार्‍या शिक्षकाला अटक

Related Posts