Crime News | व्हेलेंटाईन साजरा करायला करायला जाणं पडलं महागात, प्रेयसीच्या घरच्यांकडून हातपाय बांधून बेदम मारहाण, तरुणाचा मृत्यू

ग्वाल्हेर: Crime News | व्हेलेंटाईन वीकला प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकराची प्रेयसीच्या घरच्यांनी हत्या केल्याची घटना समोर आली आहे. गजेंद्र बघेल असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही धक्कादायक घटना ग्वाल्हेरच्या भितरवार भागात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गजेंद्र बघेल हा तरुण शिवपुरी जिल्ह्यातील त्याच्या बहिणीच्या घरी आला होता. दरम्यान रविवारी मध्यरात्री तो त्याच्या प्रेयसीला तिच्या घरी भेटायला गेला होता. प्रियसीच्या कुटुंबीयांनी त्याला पाहिले असता हातपाय बांधून बेदम मारहाण केली.
त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह कुटुंबाकडे सोपवला आहे. प्रियकर गजेंद्र बघेलच्या हत्येनंतर त्याच्या कुटुंबाने प्रेयसीच्या कुटुंबातील तीन सदस्यांवर हत्येचा आरोप केला आहे.
भितरवारचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र नागौच म्हणाले, या संपूर्ण घटनेबद्दल कुणीही उघडपणे बोलत नाहीये. तरूण आणि त्याची प्रेयसी दोन्हीही बघेल समाजाचे आहेत. असे म्हटले जाते की, प्रेयसीच्या कुटुंबाला प्रेमसंबंधाची आधीच माहिती होती. परंतू तरूणाला रंगेहाथ पकडण्यात आले आणि त्याला मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Comments are closed.