IMPIMP

Crime News | धक्कादायक ! मुलगी जिवंत होईल म्हणून आई-वडिलांनी 2 महिने घरातच ठेवला मृतदेह

by nagesh
Pune Crime | From the old controversy, he sent obscene messages in the name of the woman and slandered her for having links with terrorists

इंडोनेशिया : वृत्तसंस्था Crime News | आपल्या मुलांसाठी आई वडील काहीही करण्यास तयार असतात. ते आपल्या मुलांना खूप प्रेम करतात
तसेच खूप जपतातही पण त्याच मुलांना गमावणं हे त्यांच्यासाठी एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणे असते. इंडोनेशियामधील (Indonesia) एका जोडप्याला
अशाच एका वाईट स्वप्नाला प्रत्यक्षपणे अनुभवायला (Crime News) मिळाले. या जोडप्याला मुलीला गमवण्याचं दु:ख सहन करावं लागलं. मात्र, त्यानंतर
जोडप्यानं अस काही केलं की हे पाहून सर्वांनाच धक्का बसला. आपली मुलगी जिवंत होईल या भाबड्या आशेने तब्बल दोन महिने मुलीचा मृतदेह
घरातच ठेवल्याचे समोर आले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

एका हिंदी वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, इंडोनेशियाच्या सेंट्रल जावा येथील पलकरन गावात ही घटना घडली आहे. या जोडप्याच्या 14 वर्षाच्या मुलीला टीबी (TB) झाला होता. उपचारादरम्यान, तीचा मृत्यू (Died) झाला पण आपल्या मुलीचा मृत्यू झाला आहे यावर या जोडप्याला विश्वास बसत नव्हता. मुलगी या जगात नाही हे मान्य करण्यास हे जोडपे तयार होत नव्हते. त्यानंतर जोडप्याने दोन महिने घरातच मुलीचा मृतदेह ठेवला. ती जिवंत होईल अशी अशा त्यांनी बाळगली होती. याशिवाय आई-वडिलांनी तिला जिवंत करण्यासाठी हवनही केलं होतं. मात्र, काही दिवसांपासून घरातनं दुर्गंधी येऊ लागल्याने आसपासच्या शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिले असता, मुलीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. (Crime News)

या जोडप्याला वारंवार मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास सांगितले. पण ते काही तयार होत नव्हते. अखेर घराजवळ असलेल्या कबरीमध्ये मुलीचा मृतदेह दफन करण्यास आई वडील तयार झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. पण, ही घटना प्रत्येकाच्या हृदयलादेखील चटका लावून गेली.

Web Title : Crime News | parents kept 14 year old daughter dead body 2 months believing she would come alive crime news in marathi

हे देखील वाचा :

Coronavirus in Pune | पुणेकरांनो मुलांची विशेष काळजी घ्या ! आठवडयाभरातील धक्कादायक आकडेवारी आली समोर

Skin Care Tips | दह्यासोबत हळदीचा ‘या’ प्रकारे करा वापर, मिळतील ‘हे’ 5 आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या

Chandrakant Patil | मुंबै बँक निवडणूकीच्या निकालानंतर चंद्रकांत पाटलांचं शिवसेनेसंदर्भात मोठं वक्तव्य, म्हणाले – ‘त्यांना पुर्णपणे संपवण्याचा…’

Related Posts