IMPIMP

Crime News | तब्बल 70 गाढवांची चोरी; मालकाच्या तक्रारीनंतर पोलिसांची गल्लीबोळात शोधमोहिम

by nagesh
Crime News | theft 70 donkeys owner door police now police are searching donkeys streets crime news

जयपूर : वृत्तसंस्था Crime News | राजस्थानमधील (Rajasthan) एक विचित्र घटना घडल्याचे समोर आले आहे. हनुमागड (Hanumagad) येथील खुईयां पोलीस ठाण्याच्या (Khuiyan Police Station) हद्दीतून मागील काही काळात जवळपास 70 गाढवे चोरीला (70 Donkeys Stolen) गेल्याची माहिती समोर आलीय. परंतु, या चोरीच्या तक्रारींकडे पोलिसांनी लक्ष न घातल्याने गाढवांच्या मालकांनी आणि माकपाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (28 डिसेंबर) रोजी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. गाढवांच्या मालकांनी आणि माकपाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याने पोलीस यंत्रणा (Police System) कामाला लागली आहे. (Crime News)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

गाढवांच्या मालकांनी आणि माकपाच्या कार्यकर्त्यांनी थेट पोलीस ठाण्यावर धडक देऊन आंदोलन केल्याने आता गावागावात, गल्लीबोळात पोलिसांकडून गाढवांचा शोध घेतला जातो आहे. या शोध मोहिमेदरम्यान मंगळवारी रात्री पोलिसांनी 15 गाढवांना पकडून पोलीस ठाण्यात आणले होते. परंतु, आंदोलक मालकांनी ही गाढवे त्यांची नसल्याचे सांगत आम्हाला आमची गाढवं शोधून द्या, अशी मागणी केली. आता त्रस्त झालेले पोलिसही या गाढवांना घेऊन जावे यासाठी मालकांना समजावत आहेत. परंतु, आम्ही आमचीच गाढवं घेऊन जाऊ या मागणीवर मालक ठाम असून यातून कसा मार्ग काढायचा याबाबत पोलिस गोंधळात आहेत. (Crime News)

दरम्यान, पोलिसांनी पकडलेले 15 गाढवे मालकांना नेण्यास सांगितले. त्यावेळी मालक त्या गाढवांना चिंटू, पिंटू, कालू या नावांनी हाका मारले असता त्या गाढवांनी प्रतिसाद दिला नाही. त्यावेळी ही आमची गाढवे नाहीत असं मालकांनी सांगितलं. तसेच त्यांना जिथून आणलं तिथे सोडा, असं गाढवांच्या मालकांनी सांगितलं आहे. दरम्यान, ही गाढवं त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. एका गाढवाची किंमत 20 हजार रुपये एवढी आहे. अशाप्रकारे 70 गाढवांची किंमत तब्बल 14 लाख रुपये एवढी होते. ही गाढवं ओझे वाहून नेण्याचे काम करतात. पण, ही गाढवे चोरीला गेल्याने आमच्या उदरनिर्वाहाचे साधन गेलंय, असं गाढवांच्या मालकांनी सांगितलं. यानंतर आता या गाढवांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके (Police squad) तयार केलेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Crime News | theft 70 donkeys owner door police now police are searching donkeys streets crime news

हे देखील वाचा :

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 83 रुग्णांचे निदान; जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corona | चिंताजनक ! पुण्यातील कोरोना रूग्णांमध्ये मोठी वाढ, गेल्या 24 तासात 225 पेक्षा अधिक नवे रूग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | पुण्याच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून 5 कोटीच्या प्रकरणात खासगी सावकार नाना वाळके, अनिकेत हजारेला अटक

Related Posts