IMPIMP

Daund Pune Crime News | पुणे : नियतीचा विचित्र खेळ ! एक तासापूर्वी माहेरी आली अन् काळाने डाव साधला, विज पडून नवविवाहितेचा मृत्यू

by sachinsitapure

पुणे / दौंड :  – Daund Pune Crime News | मावस बहिणीच्या लग्नासाठी आलेल्या नवविवाहितेसोबत (Newly Married Woman) नियतीने विचित्र खेळ खेळला. विवाहितेच्या अंगावर विज पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला (Death Due To Lightning) . ही दुर्दैवी घटना दौंड तालुक्यातील कासुर्डी (Kasurdi Daund) येथे मंगळवारी (दि.11) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गावातील सोनजाई मंदिराजवळ घडली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

पोलीस पाटील अश्विनी सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहानी तुषार तम्मनर (वय-22 रा. विश्रांतवाडी, पुणे) ही विवाहिता तिच्या माहेरी कासुर्डी येथे आली होती. शेतातील कामे सुरु असल्याने सर्व कुटुंबीय शेतात होते. सुहानी हीसुद्धा तिच्या कुटुंबासोबत शेतात गेली होती. वातावरण ढगाळ होते परंतु सकाळपासूनच पावसाने उघडीप दिली होती. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक जोरदार वाऱ्यासह विजा चमकण्यास सुरुवात झाली.

काही कळण्याच्या आत एक जोरदार आवाज होऊन वीज सुहानी हिच्या अंगावर पडली. कुटुंबीयांनी तिला तातडीने उरुळी कांचन येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी सुहानी हिला तपासून मृत घोषीत केले.

सुहानीचा मागील वर्षी विवाह झाला होता. तिचे सासर पुण्यातील विश्रांतवाडी येथील आहे. तिच्या मावशिच्या मुलीच्या लग्नासाठी ती माहेरी आली होती. गुरांना घास आणण्यासाठी भावासोबत शेतात गेली असता अचानक अंगावर विज पडून तिचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Posts