Jalna Crime News | पैशाच्या देवाण-घेवाणीतून एकाचा गळा चिरून खून, घटनेने शहरात खळबळ

जालना: Jalna Crime News | पैशाच्या देवाण-घेवाणीतून एकाचा गळा चिरून खून केल्याची घटना घडली आहे. शहरातील सेंट मेरी स्कुलच्या पाठीमागे सोमवार (दि.२७) ही घटना घडली. उमेश राख असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी स्वतःहून सदर बाजार पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. (Murder Case)
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गायत्री नगर परिसरात रमेश राख आणि उमेश क्षीरसागर यांच्यात पैशांची देवाण-घेवाण होती. पैशाच्या देवाण घेवाणीतून या दोघांमध्ये वाद होऊन उमेश क्षीरसागर याने रमेशचा चाकूने गळा चिरून खून केला. या घटनेनंतर आरोपी उमेश काशिनाथ क्षीरसागर हा स्वतः सदर बाजार पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक शाखेच्या पथकासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केला आहे.
Comments are closed.