Katraj Pune Crime News | कात्रज घाटात गोळीबार, पिस्तुल सापडले ! गुंडांकडून मारण्याचा प्रयत्न की आत्महत्येचा प्रयत्न; नेमके काय घडले, वाचा सविस्तर

पुणे : Katraj Pune Crime News | कात्रज घाटात गोळीबार (Firing In Katraj Ghat) झाला असून एक तरुण जखमी असल्याचे समजल्यावर पोलीस (Pune Police) तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी तरुणाला रुग्णालयात दाखल केले. दोघा जणांनी आपल्यावर गोळीबार केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. त्यांना पिस्तुल सापडले. सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासले़ पण, नेमका प्रकार लक्षात येत नव्हता. तेव्हा या तरुणाला पुन्हा विश्वासात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्याने कर्जाला कंटाळून आपण स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
दिपक राजू लुकट (वय ४४, रा. औंध) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (Bharti Vidyapeeth Police Station) हद्दीमध्ये सोमवारी रात्री कात्रज मार्शल हे पेट्रोलिंग करत असताना घाटात एक तरुण जखमी असल्याचे समजले. त्यांनी इतरांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याच्या खांद्याच्या बाजूला छातीजवळ गोळी लागली होती. या तरुणाने सांगितले की दोघांनी कात्रज घाटात घेऊन जाऊन माझ्याकडून जबरदस्तीने पैसे घेऊन गोळीबार केला. गोळीबारासारखी घटना लक्षात घेऊन पोलिसांनी गांभीर्याने त्यात लक्ष घातले. संपूर्ण परिसर तपासला. तेथे पिस्तुल आढळले. सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक माहितीच्या आधारे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. पण गोळीबाराच्या घटनेला बळकटी देईल असा काही पुरावा मिळत नव्हता. तेव्हा या तरुणाला त्यांनी पुन्हा विश्वासात घेऊन विचारपूस केली. तेव्हा त्याने आपल्यावर कर्ज असून आपण स्वत:च आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या तरुणाला खुलासा ऐकल्यावर पोलिसांचा जीव भांड्यात पडला. भारती विद्यापीठात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
Comments are closed.