IMPIMP

Kolhapur Crime | न्यायाधिशांच्या कुटुंबातील महिलांचे कपडे ‘तो’ चोरायचा, पकडल्यानंतर धक्कादायक कारण आलं समोर

by nagesh
Pune Pimpri Crime | A tempo transporting animals for slaughter was caught in Pimpri Chinchwad

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन – Kolhapur Crime | दागिने, पैसे, वाहन, महागड्या वस्तूंची चोरी झाल्याचे आजपर्यंत ऐकले असेल. पण कोल्हापूरमध्ये (Kolhapur Crime) एक विचित्र घटना समोर आली आहे. कोल्हापूरमध्ये महिलांचे कपडे (Stealing Ladies Clothes) चोरणाऱ्या एका 30 वर्षाच्या तरुणाला पोलिसांनी अटक (Arrest) केली. ही घटना कोल्हापुरातील भुदरगड (Bhudargad) येथील आहे. न्यायाधीशांच्या कुटुंबाचेच (Judge Family) कपडे चोरी होत होते आणि या प्रकरणात संबंधित तरुणाला रंगहेथ पकडण्यात आले. आरोपीला अटक केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मागील महिन्यापासून सकाळी वाळत घातलेले कपडे अचानक गायब होत होते. पहिल्यांदा डिसेंबरमध्ये कपड्यांची चोरी झाली होती. त्यानंतर तीने ते चार वेळा हा प्रकार घडल्याने कपडे अचानक कसे गायब होतात असा प्रश्न न्यायाधीश आणि त्यांच्या कुटुंबाला पडला. न्यायाधीशांनी याबाबत भुदरगड पोलीस ठाण्यातील (Bhudargad Police Station) अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावले. (Kolhapur Crime)

सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोर कंपाऊंडच्या भिंतीवरुन उडी मारुन आवारात वाळत घातलेल्या कपड्यांकडे जाताना दिसला. वाळत घातलेले कपडे चोरुन पळून जातानाची दृश्य सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली होती. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी पहाटे न्यायालयाच्या दोन कर्मचाऱ्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करुन न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

धक्कादायक माहिती समोर
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, तपास अधिकारी (Investigating Officer) आणि पोलीस उपनिरीक्षक सतीश मयेकर (PSI Satish Mayekar) यांनी सांगितले की, सुशांत सदाशिव चव्हाण Sushant Sadashiv Chavan (वय-30 रा. गारगोटी, ता. भुदरगड जि. कोल्हापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सुशांत याला काही मानसिक त्रास (Mental Distress) असल्याचे त्याच्या आईने पोलिसांना सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आरोपी सुशांत हा पहाटे उठायचा आणि कपडे चोरी करायचा.
विशेषत: महिलांचे कपडे चोरी करुन तो स्वत: पेहराव करायचा आणि नंतर फेकून द्यायचा.
तो मानसिकदृष्ट्या आजारी आहे की नाही हे तपासण्यासाठी आम्ही वैद्यकीय तापसणी करणार असल्याचे मयेकर यांनी सांगितले.

मयेकर यांनी सांगितले की, संशयिताच्या आईने सांगितले की, तो लहान असताना त्याच्या डोक्यात कुणीतरी दगड मारला होता.
लहानपणापासूनच तो विचित्र गोष्टी करतो.
चौकशी दरम्यान त्याने सांगितले की, तो दररोज पहाटे चार वाजता अचानक उठतो आणि नंतर काय करतो ते त्याला आठवत नाही.

Web Title :- Kolhapur Crime | kolhapur youth nabbed by judge while stealing ladies clothes now shocking information reveals

हे देखील वाचा :

Budget 2022 | अर्थसंकल्पापूर्वी करदात्यांसाठी चांगली बातमी, जाणून घ्या तुम्ही कसा घेऊ शकता लाभ?

PPF | रोज 250 रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर मिळतील 62 लाख, जाणून घ्या संपूर्ण योजना

BMC Mayor Kishori Pednekar | ‘राणीच्या बागेतील हत्तीच्या पिल्लाचं नाव ‘चिवा’ अन् माकडाचं नाव ‘चंपा’ ठेवू’ – महापौर किशोरी पेडणेकरांचं प्रत्युत्तर

Related Posts