Kolhapur Crime News | ट्रेडिंग कंपनीमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने 5 जणांची 31 लाखांची फसवणूक

कोल्हापूर: Kolhapur Crime News | ट्रेडिंग कंपनीमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीची व्याप्ती वाढताना दिसत आहे. श्रेणिक दत्तात्रय गुरव (मूळ गाव हरोली, ता- शिरोळ, सध्या रा- ग्रीन व्हॉली अपार्टमेंट, शेषन रोड, जयसिंगपूर) याच्या विरोधात नव्याने पाच जणांनी ३० लाख ९० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. (Cheating Fraud Case)
ट्रेंडिग कंपनीमध्ये गुंतवणूक करतो, असे सांगून ८१ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रेणीक गुरव याच्याविरोधात १९ डिसेंबर रोजी जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. यानंतर या फसवणुकीची व्याप्ती वाढत गेली असून, आणखी पाच जणांनी जयसिंगपूर पोलिसांत आपली तक्रार दाखल केली आहे. पाच जणांकडून ३० लाख ९० हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. यातील संशयित गुरव हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , श्रेणीक दत्तात्रय गुरव याचे जयसिंगपूर येथील समर्थ ट्रेडिंग अँड सर्व्हसेस या कार्यालयात ४ऑगस्ट २०२३ ते १६ मे २०२४ या दरम्यान जयसिंगपूर येथील विजय बाळासाहेब माणगावे यांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांना त्याचे एकूण ९१ लाख रुपये गुंतवण्यास भाग पाडले.
मात्र, राहिलेली ८१ लाख रुपये रक्कम व त्यावरील परतावा न देता त्यांची फसवणूक केल्याने जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयसिंगपूर पोलिसांनी सोमवारी संशयित श्रेणीक गुरव याच्या सध्या बंद असलेल्या समर्थ ट्रेंडिग अँड सर्व्हसेस या कार्यालयाची स्थळ पाहणी केली आहे.
Comments are closed.