IMPIMP

Kolhapur Crime News | कर्ज भागवण्यासाठी आजी पैसे देत नसल्याने राग अनावर, नातवाने आजीचा गळा आवळून संपवलं, आजीच्या अंगावरील दागिने घेऊन पसार

February 13, 2025

कोल्हापूर: Kolhapur Crime News | कर्ज भागवण्यासाठी आजीकडे वारंवार पैशाची मागणी करून देखील आजी पैसे देत नसल्याच्या रागातून नातवाने दोन मित्रांच्या मदतीने आजीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सगुणा तुकाराम माधव (वय ८०) असे मृत आजीचे नाव आहे. याप्रकरणी नातू असलेला संशयित आरोपी गणेश राजाराम चौगले (वय-२२, रा. विक्रमनगर इचलकरंजी) यासह मित्र नरेश उर्फ नरेंद्र दगडू करपे (वय-२५) आणि एका अल्पवयीनला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. (Murder Case)

मिळालेल्या माहितीनुसार, काढलेलं कर्ज फेडण्यासाठी गणेश चौगले याने इचलकरंजीतील विक्रमनगर येथील राहतं घर विकले होते. तरीसुद्धा त्याच्यावर कर्ज होतं. सगुणा आजीच्या नावे बँकेत २ लाख रुपये शिल्लक होते, म्हणून त्याने आजीकडे १ लाख रुपयांची मागणी केली होती. पण आजीने नकार दिला. दरम्यान मंगळवार (दि ११) रोजी नातू गणेश चौगुलेने मित्राच्या मदतीने आजीचा गळा आवळून, तिचं डोके आपटून तिची हत्या केली. नंतर तिच्या हातातील सोन्याच्या दोन पाटल्या आणि कानातील सोन्याची कर्णफुले काढून नेली

दरम्यान पोलिसांनी संशयितांना अटक केली असून आरोपीकडून सोन्याच्या पाटल्या, कर्णफुले आणि मोटरसायकल असा ४ लाख किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुढील तपासासाठी मुरगुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान सर्व संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.