IMPIMP

Kondhwa Pune Crime News | कोंढवा खुर्द: बनावट कागदपत्रे तयार करुन प्लॉटची विक्री, सव्वा कोटींची फसवणूक

Pune Crime News | Court was cheated by creating fake documents to show child as minor, case registered against seven people
June 10, 2024

पुणे :  – Kondhwa Pune Crime News | मयत व्यक्तीच्या नावाने बनावट कागदपत्रे (Fake Documents) तयार करुन फ्लॅटची विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींनी तक्रारदार व्यक्तीची सव्वा कोटी रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केली आहे. हा प्रकार सन 2022 ते 9 जून 2024 या कालावधीत कोंढवा खुर्द (Kondhwa Khurd) येथील शालीमार हिल पार्क (Shalimar Hill Park in Kondhwa) येथे घडला आहे.

याबाबत श्रीकांत जयवंत पाटील (वय-57 रा. प्रिस्टीन कॉन्स्टलेशन, औध, पुणे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन लता भीमशा शेट्टी (रा. लोहार गल्ली जवळ, शात्री चौक, शाहदाबाद ग्रामीण कलबुर्गी, कर्नाटक), जकिअनवर मुल्ला (रा. परमार भवन, कोंढवा रोड, कोंढवा खुर्द) यांच्यावर आयपीसी 404, 408, 420, 465, 467, 471, 120 ब नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचे काका स्व. विजय पाटील यांच्या नावाने शालीमार हिल पार्क मधील एल बिल्डींगमध्ये फ्लॅट आहे. बाजारमुल्याप्रमाणे या फ्लॅटची किंमत एक कोटी 25 लाख रुपये आहे. आरोपी लता शेट्टी हिने बनावट कागदपत्राच्या आधारे बक्षीसपत्र तयार करुन घेतले. या बनावट कागदपत्राच्या आधारे आरोपी जकिअनवर मुल्ला यांना फिर्यादी यांच्या काका यांच्या मालकीचा फ्लॅट विकला. आरोपींनी संनमत करुन फिर्यादी यांच्या काकाच्या फ्लॅटची बनावट कागदपत्राच्या आधारे सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.