IMPIMP

Lonikand Pune Crime News | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार, दागिने अन् पैसे घेऊन प्रियकर पसार

by sachinsitapure

पुणे :  – Lonikand Pune Crime News | विवाहीत महिलेसोबत अनैतिक संबंध (Immoral Relationship) ठेवून तिला लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तिच्यासोबत शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. त्यानंतर तिच्याकडून सोन्याचे दागिने आणि पैसे घेऊन लग्न करण्यास नकार देऊन फसवणूक केली (Cheating Fraud Case). याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police Station) एका व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 2019 ते 1 जून 2024 या कालावधीत घडला आहे.

याबाबत 36 वर्षीय महिलेने मंगळवारी (दि.11) लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अजित भिमराव वनवे
Ajit Bhimrao Wanve (रा. मु.पो. कासार शिरशी, ता.जि. बिड) याच्यावर आयपीसी 376/2/एन, 323, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक विजया वंजारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिलेचे पहिले लग्न झाले असून त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. महिला एका हॉस्पिटलमध्ये कामाला असून आरोपी ड्राव्हर आहे. त्या दोघांमध्ये मागिल सहा वर्षापासून संबंध आहेत. त्यांच्या संबंधाची माहिती महिलेच्या पतीला समजल्यानंतर ते दोघे विभक्त राहू लागले. आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

दरम्यान, आरोपीने महिलेला लग्न करणार असल्याचे सांगून तिच्याकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेतली. महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास टाळाटाळ केली. तसेच महिलेची शारीरिक, मानसिक व ब्लॅकमेल करुन आर्थिक पिळवणूक केली. मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन व मुलीवर अत्याचार करण्याची धमकी देऊन पैसे घेतले. तसेच महिलेला मारहाण करुन वारंवार अत्याचार केले. आरोपी अजित वनवे पैसे व दागिने घेऊन पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजया वंजारी (API Vijaya Vanjari) करीत आहेत.

Related Posts