IMPIMP

Maharashtra Crime | महाराष्ट्रातील प्रसिद्ध डॉ. देवानंद जाजू यांची झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या, शहरात प्रचंड खळबळ

by Team Deccan Express
Maharashtra Crime | famous doctor devanand jaju commits suicide in nanded

नांदेड : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Crime | नांदेड शहरातील प्रसिद्ध डॉ. देवानंद जाजू (Dr. Devananda Jaju) यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन (Taking Sleeping Pills) आपलं आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ. जाजू यांच्या आत्महत्येची (Commits Suicide) घटना समोर आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. जाजू हे शहरातील प्रसिद्ध जाजू हॉस्पिटलचे प्रमुख (Jaju Hospital) होते. तसेच ते भाजपच्या (BJP) वैद्यकीय आघाडीचे प्रमुख (Medical Lead Head) होते. जाजू यांनी आत्महत्या का केली ? याची माहिती अद्याप समजू शकली नाही. नांदेडचे (Nanded Crime) ग्रामीण पोलीस (Nanded Rural Police) याप्रकरणी तपास करत असून तपासाअंती सत्य बाहेर येईल असे पोलिसांनी सांगितले. (Maharashtra Crime)

डॉ. देवानंद जाजू हे मागील 20 ते 25 वर्षापासून नांदेड शहरातील (Nanded Crime) सिडको भागात (CIDCO) वैद्यकीय सेवा देत होते. त्यांचे रुग्णालय आणि निवासस्थान एकाच ठिकाणी आहे. त्यांच्या पत्नीदेखील डॉक्टर आहे. पण त्या मुलींच्या शिक्षणासाठी बाहेरगावी राहतात. तर डॉ. जाजू हे नांदेड मध्ये राहत होते. दरम्यान आज दुपारी नांदेड ग्रामीण पोलिसांना डॉ. जाजू यांच्या आत्महत्येची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी डॉ. जाजू यांचा मृत्यू झाला होता. (Maharashtra Crime)

डॉ. जाजू यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. जाजू यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात (District Hospital) पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर त्यांच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती समोर येईल. डॉ. जाजू हे वैद्यकीय, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title :- Maharashtra Crime | famous doctor devanand jaju commits suicide in nanded

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts