IMPIMP

Maharashtra Police | महिला पोलिसाची बदनामी करणारा निघाला पोलिस कर्मचारी; पोलीस दलात खळबळ

by bali123
Maharashtra Police | A police officer who went to defame a female police officer; Excitement in the police force

जळगाव न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Police | काही दिवसापूर्वी जळगाव (Jalgaon) शहरातील पोलीस मुख्यालयात असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या (Maharashtra Police) नावे पोलिस आणि पत्रकारांना अश्लील संदेश पाठवले होते. यावरून महिला पोलीस कर्मचाऱ्याची बदनामी प्रकरणी सायबर शाखेत (Cyber Crime Branch) या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. यावरून तपासादरम्यान पोलिसांनी मुख्यालयातच (Headquarters) कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले.

याप्रकरणी तपासणी करतेवेळी पोलिसांनी मुख्यालयातच (Police Headquarters) सायबर शाखेत कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले.
याच पोलीस कर्मचाऱ्याने गुन्हा केल्याचे तपासात समोर आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
नरेंद्र पाटील (Narendra Patil) हे पोलीस मुख्यालयात अनेक वर्षापासून कार्यरत आहेत.
पोलीस मुख्यालयातील काही तांत्रिक शाखा, वाचक शाखा आणि स्थानिक गुन्हे शाखेशी निगडित असलेल्या शाखांमध्ये काही कर्मचारी वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी कार्यरत आहेत.
तर, बदलीच्या वेळी तात्पुरती एखाद्या पोलीस ठाण्यात बदली दाखवून त्यांना पुन्हा पोलीस मुख्यालयातील शाखेत संलग्नित केले जाते.

दरम्यान, या शाखेतील काही कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जवळीक करून त्यांची मने जिंकून घेतात. जिल्ह्यातील पोलीस स्टेशन आणि पोलीस कर्मचाऱ्याबाबत ते अधिकाऱ्यांना माहिती पुरवीत असल्याने अधिकारी देखील त्यांना पाठीशी घालत त्याच ठिकाणी नेमणूक देतात.
अशी चर्चा पाेलिस दलाच्या वर्तुळात दिसून येत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

पोलिस मुख्यालयातील महिला कर्मचाऱ्याच्या नावे काही दिवसांपूर्वी मुख्यालयातील पोलीस अधिकारी, कर्मचारी व काही पत्रकारांना अश्लील मेसेज पाठविण्यात आले होते.
या प्रकरणी संबंधित महिलेने सायबर शाखेत तक्रार दाखल केली होती.
जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे (SP Dr. Praveen Mundhe), अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी (Add SP Chandrakant Gawli) यांनी या प्रकरणी तपासाच्या सूचना केल्यानंतर संबंधित व्यक्तीचे लोकेशन नाशिक येथे आले होते.
दरम्यान, सायबर पोलीस ठाण्याचे पीआय बळीराम हिरे (PI Baliram Hire) यांच्या पथकाने मेसेज
केलेल्या मोबाईलचे लोकेशन आणि CCTV फुटेज तपासले असता पोलीस मुख्यालयात कार्यरत
असलेल्या नरेंद्र लोटन पाटील (Narendra Patil) (वारुळे) याला ताब्यात घेतले आहे.

Web Title : Maharashtra Police | A police officer who went to defame a female police officer; Excitement in the police force

Pune Crime | ‘तू पांढऱ्या पायाची आहेस’ असे म्हणून विवाहितेला मारहाण; पतीसह 5 जणांवर FIR

Bank Scam | 4300 कोटीच्या घोटाळ्याच्या आरोपात सहभागी असलेल्या ‘या’ व्यक्तीच्या पत्नीने 9 महिन्याच्या बाळाला दिले 40 कोटी रुपयांचे गिफ्ट, जाणून घ्या

Tahsildar Jyoti Deore Audio Clip | पारनेरच्या तहसीलदार ऑडिओ क्लिप प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला ‘हा’ महत्वाचा आदेश 

Related Posts