IMPIMP

Maharashtra Police | गृहमंत्र्यांच्या नावे 10 लाखांची खंडणी; 5 पोलिसांवर ‘FIR’ दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

अकोला : सरकारसत्ता ऑनलाइन –  Maharashtra Police | राज्याचे माजी गृहमंत्री यांच्या नावाने शहरातील नामांकित ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांला (Transport Professional) दहा लाखांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणामध्ये गुन्हे शाखेतील 5 तत्कालीन पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हे (FIR) दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने (Court) दिले आहे. वाशीम बायपास परिसरातील विजय ट्रान्सपोर्टचे संचालक अब्दुल आसिफ यांच्याकडील वाहनांची तपासणी करण्याच्या नावाखाली तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेत (lcb) कार्यरत ५ पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध (Maharashtra Police) गृहमंत्र्यांच्या नावानी 10 लाखांची खंडणी मागितल्याची फिर्याद अब्दुल आसिफ (Abdul Asif) यांनी केली होती.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

काय म्हटलं आहे तक्रारीत?

अब्दुल आसिफ (Abdul Asif) यांचे 3 ट्रक बळजबरीने एलसीबी आवारात गैरकायदेशीर उभे करून
ठेवले आणि गुन्हे दाखल करण्याची धमकी देत राज्याच्या तत्कालीन गृहमंत्र्यांच्या नावाने 10 लाखांची मागणी केल्याचे आसिफ यांनी तक्रारीत म्हटले होते.
तसेच, या तक्रारीची प्रतिलिपी पंतप्रधान, परिवहन मंत्री, पोलिस महासंचालक, अमरावती विभाग पोलिस महानिरीक्षक, अकोला जिल्हा पोलिस यांना देखील दिली होती.
परंतु, पोलिसांकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. पोलिस महानिरीक्षकांकडूनही या प्रकरणाची चौकशी झाली. दरम्यान.
मध्यतंरी खंडणी मागितल्याचा आरोप असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची स्थानिक गुन्हे शाखेतून बदली झाली आहे.

दरम्यान, तत्कालीन पीआय शैलेस सपकाळ (PI Shailes Sapkal) यांचीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली झाली.
आसिफ यांनी या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून सातत्याने संबंधितांकडे दोषींवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली होती.
परंतु, कारवाई न झाल्याने त्यांनी याविरुद्ध कोर्टात (Court) धाव घेतली.
याप्रकरणी कोर्टात याचिका दाखल केली. तर, दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून तथ्य व परिस्थितिजन्य पुरावे स्वीकार्य करुन जयंता श्रीराम सोनटक्के (Jayanta Shriram Sontakke), किशोर काशीनाथ सोनावणे (Kishor Kashinath Sonawane), वसिमोद्दिन अलिमोद्दिन (Vasimoddin Alimoddin),
अश्विन हरिप्रसाद मिश्रा (Ashwin Hariprasad Mishra) व अन्य एकाविरुद्ध वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्याचा आदेश कोर्टाने दिलाय.

या दरम्यान, याचिककर्त्यांकडून ॲड. नजीब शेख (Adv. Najeeb Sheikh) यांनी युक्तिवाद केला. या प्रकरणात आता पोलिस न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करतात का याकडे नागरिकांचे लक्ष लागुन आहे.

Web Title : Maharashtra Police | ransom in the name of the home minister order to file charges against the police akola

हे देखील वाचा :

Pune | गणपती विसर्जन मिरवणुकीला लकडी पुलावरील मेट्रो पुलाचा अडथळा, चर्चेसाठी तात्काळ बैठक बोलवा, आबा बागुल यांची मागणी

Belgaum Corporation Election result | बेळगाव महापालिकेत भाजपचा झेंडा, BJP स्पष्ट बहुमतात

Kirit Somaiya | ‘दोन्ही अनिल लवकरच जेलमध्ये जाणार’ – किरीट सोमय्या

Related Posts