IMPIMP

Mumbai-Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाचा टँकर पलटी; तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांची मोठी झुंबड

by Team Deccan Express
Mumbai-Ahmedabad Highway Accident | palghar edible oil tanker accident local people came to collect oil

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Mumbai-Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खाद्यतेलाच्या टँकरचा (Edible oil Tankers) अपघात झाल्याची घटना (Mumbai-Ahmedabad Highway Accident) घडली आहे. हा अपघात तवा व सोमटा या पालघर तालुक्यातील गावाजवळ झाला आहे. टँकर पलटी झाल्यानंतर टँकरमधून तेल गळती सुरू झाली. दरम्यान यावेळी परिसरातील गावकऱ्यांची तेल गोळा करुन घेऊन जाण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. (Edible oil tanker overturns on Mumbai-Ahmedabad highway)

गुजरातकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर खाद्यतेल घेऊन जाणाऱ्या या ट्रकचा अपघात घडला. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. टँकर उलटल्यानंतर त्यामधून तेल गळती सुरू झाली असून तेल रस्त्यालागत खड्ड्यामध्ये गोळा होत आहे. दरम्यान, गळती होणारे तेल गोळा करण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड उडाली आहे. घरातील भांडीकुंडी, हांडे, कॅन घेऊन तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे.

Web Title : Mumbai-Ahmedabad Highway Accident | palghar edible oil tanker accident local people came to collect oil

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts