IMPIMP

23 वर्षीय शेजारीण माझ्या पतीला ‘अंडरगारमेंट्स’ दाखवते, 42 वर्षीय महिलेने पोलिसांकडे ‘ही’ मागणी; अधिकारी हैराण

by nagesh
neighbour woman | woman demands police arrest her neighbour for hanging her underwear out in the garden

मेक्सिको सिटी : वृत्तसंस्था शेजार्‍यांमध्ये (neighbour woman) भांडण ही सामान्य बाब आहे. कधी-कधी तर छोट्या-छोट्या गोष्टींवरून मोठी हाणामारी सुद्धा होते, परंतु मेक्सिको (Mexico) मध्ये एका अजब गोष्टीवरून दोन शेजार्‍यांमध्ये (neighbour woman) भांडण सुरू आहे. महिलांच्या या भांडणाने पोलिसांना सुद्धा हैरण केले आहे. पोलिसांनाही समजत नाही की अखेर हे भांडण कसे सोडवायचे. अधिकार्‍यांनी दोन्ही महिलांना चर्चेतून वादावर तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

महिलेने केला आरोप

‘द सन’च्या रिपोर्टनुसार, मेक्सिकोचे दक्षिणपूर्व राज्य क्विंटाना रू (Quintana Roo) येथे राहणारी 42 वर्षांच्या युवित्झा (Yuvitza) ने पोलिसांकडे मागणी केली आहे की, तिच्या शेजारी राहणार्‍या 23 वर्षीय महिलेला अटक करावी. युवित्झाचे म्हणणे आहे की, शेजारीण जाणवीपूर्वक आपले अंडरगार्मेंट (Undergarments) गार्डनमध्ये सुकवते, जेणेकरून तिच्या पतीला आपल्या जाळ्यात ओढता येईल. महिलेने म्हटले की, शेजारीन तिच्या पतीला जाळ्यात पकडू पहात आहे आणि आपले अंडरगार्मेंट दाखवून त्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.

अनेकदा समजावले पण ऐकत नाही

युवित्झाचे म्हणणे आहे की, अनेकदा या महिलेला असे करू नको म्हणून सांगितले पण ती ऐकत नाही. युवित्झाचा दावा आहे की, शेजारीण असे विशेषता पतीच्या सुटीच्या दिवशी करते.
ती तिच्या पतीकडे एकटक पहात असते. विचित्र नजरेने पाहते आणि आपले अंडरगार्मेंट दाखवून जाळ्यात अडकवू पहात आहे.

पोलिसांना समजत नाही की, युवित्झाला कसे समजवावे की, तिची शेजारीन उघड्यावर अंडरगार्मेंट सुकवून कोणताही गुन्हा करत नाही.
पोलिसांनी दोन्ही महिलांना आपसात चर्चा करून वाद सोडवण्यास सांगितले आहे.
एका अधिकार्‍याने म्हटले, या बाबतीत कोणताही गुन्हा झालेला नाही.
यासाठी पोलीस कोणतीही तक्रार दाखल करू शकत नाहीत. दोघींनी आपसात बोलून वाद मिटवावा.

Web Title : neighbour woman | woman demands police arrest her neighbour for hanging her underwear out in the garden

हे देखील वाचा :

Gauhati High Court | उच्च न्यायालयाचा निर्णय ! ‘मुस्लिम व्यक्तीनं हिंदू स्त्रीसोबत केलेला दुसरा विवाह अवैध’

Whatsapp | ‘व्हॉट्सअ‍ॅप’ स्लो होतय का? मग करा लवकर ‘क्लीन’; जाणून घ्या सोपी प्रोसेस

Politics In Cricket | टीम इंडियामध्ये ‘एन्ट्री’ केल्यानंतर ‘राजकारणा’मुळे बिघडले ‘या’ 11 भारतीय खेळाडूंचे करियर, जाणून घ्या

Related Posts