PSI Suicide In Nashik | प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकाचा टोकाचा निर्णय, पोलिस अकादमीतल्या राहत्या खोलीत गळफास घेत संपवलं जीवन, घटनेने पोलीस दलात खळबळ

नाशिक : PSI Suicide In Nashik | प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक म्हणून २०२५ मध्ये पोलिस सेवेत रुजू झालेल्या अधिकाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमेश्वर भानुदास गोरे (वय-२८) असे जीवन संपवलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. महाराष्ट्र पोलिस अकादमीतल्या (एमपीए) वसतिगृहातील राहत्या खोलीत त्यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. ही घटना सोमवार (दि.१७) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
अधिक माहितीनुसार, सोमेश्वर गोरे हे बीड जिल्ह्यातील धोंडगाई गावचे मूळ रहिवासी होते. जानेवारी २०२५ मध्ये त्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाल्यापासून ते एमपीएमध्ये वास्तव्यास होते. दरम्यान सोमेश्वर गोरे यांनी टोकाचा निर्णय का घेतला? याबाबत नेमकं कारण समोर आलेलं नाही. गंगापूर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Comments are closed.