IMPIMP

Pune Anti Corruption | 2.5 लाखाची लाच घेताना पुण्यातील शिक्षण संस्थेच्या महिला अध्यक्षासह तिघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, शैक्षणीक क्षेत्रात प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Anti Corruption | anti-corruption arrested three including a woman president of an educational institution in Pune, taking bribe of Rs 2.5 lakh, huge excitement in the education sector

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Anti Corruption | सेवा निवृत्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी 2 लाख 50 हजार रुपयाची लाच स्विकारताना (Accepting Bribe) पुण्यातील (Pune) शिक्षण संस्थेच्या महिला अध्याक्षासह (Education Institute President) लिपीक आणि खासगी व्यक्तीला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई बुधवारी (दि.13) करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune Anti Corruption) केलेल्या या कारवाईमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.

तळेगाव ढमढेरे येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयाचे (Samajbhushan Sambhajirao Bhujbal Vidyalaya) अध्यक्ष मंगल शिवाजीराव भुजबळ
Mangal Shivajirao Bhujbal (वय -63), लिपीक संदिप रंगनाथ गायकवाड Sandeep Ranganath Gaikwad (वय-40) खासगी इसम शिवाजीराव बाळासाहेब भुजबळ
Shivajirao Balasaheb Bhujbal (वय-62) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी 24 वर्षीय तरुणाने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे वडिल तळेगाव ढमढेरे येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ महाविद्यालयात शिपाई पदावर कार्यरत आहेत.
त्यांची प्रकृती बरी नसल्याच्या कारणावरुन त्यांना नोकरीवरुन कमी न करण्यासाठी आणि भविष्यात सेवानिवृत्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी आरोपींनी तक्रारदार यांच्याकडे 3 लाख 50 हजार रुपये लाच मागितली. तडजोडीमध्ये 2 लाख 50 हजार रुपये देण्याचे ठरले.
तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Pune Anti Corruption) तक्रार केली.

विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.13) पडताळणी केली असता आरोपींनी तक्रारदार यांच्याकडे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची 2 लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायालयाने तिघांना शनिवार (दि.16) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुढील तपास पोलीस उप अधीक्षक सीमा आडनाईक (Deputy Superintendent of Police Seema Adnaik) करीत आहेत.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (SP Rajesh Bansode) परिक्षेत्राचे अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav), सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgauda) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

Web Title : Pune Anti Corruption | anti-corruption arrested three including a woman president of an educational institution in Pune, taking bribe of Rs 2.5 lakh, huge excitement in the education sector

हे देखील वाचा :

Foods for Vitamin C Deficiency | ‘व्हिटॅमिन सी’च्या कमतरतेमुळे होऊ शकतो ‘हा’ भयंकर आजार, बचावासाठी सेवन करा ‘हे’ 8 फूड

Gold Price Today | सोन्याच्या दरात तेजी, 47 हजारच्या जवळ पोहचले; चांदीची सुद्धा चमक वाढली, जाणून घ्या नवीन दर

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 103 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts