IMPIMP

Pune Baner Crime | भांडी घासण्यास सांगितल्याने चाकूने तरुणाचा केला खून; बाणेरमधील घटना

by nagesh
Pune Crime | a woman was killed and stoned in the head in chakan mhalunde pune district

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Baner Crime | सकाळची राहिलेली भांडी घासण्यास सांगितल्याच्या कारणावरुन भाजी कापण्याच्या चाकूने भोसकून आपल्या सहकार्‍याचा खून (Murder In Pune) केल्याची घटना बाणेर (Baner) परिसरात घडली आहे. अमर बसंत मोहापात्रा (वय २८, रा. प्रथम ब्लीस सोसायटी, बाणेर, मुळ ओडिसा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police Station) अनिलकुमार सरतकुमार दास (वय २१) याला अटक केली आहे. (Pune Baner Crime)

याप्रकरणी बिरजु भुवनेश्वर साहू (वय ४०, रा. प्रथम ब्लीस सोसायटी, बाणेर) याने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (गु रजि नं. १६९/२०२२) फिर्याद दिली आहे. ही घटना बाणेरमधील प्रथम ब्लीस सोसायटीत शुक्रवारी रात्री ९.४० वाजता घडली. (Pune Baner Crime)


याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी, आरोपी आणि मयत हे तिघेही मुळचे ओडिशाचे राहणारे असून पुण्यात एका सलूनच्या दुकानात काम करतात. तिघेही एकत्र राहतात. रात्री घरी आल्यावर अमर याने सकाळची राहिलेली भांडी घासण्यास अनिलकुमार याला सांगितले होते. त्यावरुन “तू मुझे बरतन धोने के लिए बोलता है क्या, तुझे आज खल्लास करता हूॅ,” असे म्हणून त्याने किचन कट्ट्यावरील भाजी कापण्याचा चाकू घेऊन अमर याच्या छातीत खुपसला. वर्मी वार लागल्याने त्यात अमर मोहापात्रा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलीस तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अनिलकुमार दास याला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे (Senior Police Inspector Rajkumar Waghchaure) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Baner Crime | Murder in baner area of chaturshringi police station pune

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | खूशखबर ! सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील पोलिस कर्मचाऱ्याचा 30 वर्षीय इंजिनिअर महिलेबरोबर ‘डर्टी पिक्चर’ ! नग्न फोटो व व्हिडीओ ‘सोशल’वर पोस्ट करण्याची धमकी देत वेळोवेळी बलात्कार

PMPML Punyadasham Bus Service | ‘पुण्य दशम’ बससेवा मोफत मिळणार ! पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांची सकारात्मक भुमिका

Prakash Ambedkar on Raj Thackeray | औरंगाबाद संवेदनशील शहर ! ‘राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी देऊ नये’ – प्रकाश आंबेडकर

Pune Crime | मोकळ्या जागेत अनधिकृतपणे अतिक्रमण ! पुण्यातील दिपक सिंग, पंकज सुराणा, सांकेश सुराणावर FIR

Related Posts