IMPIMP

Pune Crime | पुण्याच्या हिंजवडीमधील जमीन नावावर करून घेत 2.5 कोटींची फसवणूक; उत्तुंग पाटीलला अटक

by nagesh
Pune Crime | 2.5 crore fraud in the name of land in Hinjewadi, Pune; Uttung Patil arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन नावावर करून घेत तब्बल 2 कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार हिंजवडीत घडला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police) उत्तुंग कृष्णराव पाटील (वय 28, रा. रहाटणी) याला अटक (Pune Crime) केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

प्रतिम सुरेंद्र पाषाणकर (Pritam Surendra Pashankar वय-44) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार उत्तुंग कृष्णराव पाटील (Uttung Krishnarao Patil) यांच्यासह तीघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मे ते जून 2021 दरम्यान हिंजवडी फेज एक(hinjewadi phase 1) परिसरात हा प्रकार घडला. फिर्यादी आणि त्यांचे वडील यांच्या नावावर मुळशी तालुक्यातील (Mulshi) गोडांबेवाडी येथे जमीन आहे. आरोपींनी ती जमीन बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून तसेच खोट्या सह्या करून साठेखत आणि कुलमुखत्यारपत्र तयार करून त्यांच्या नावावर करून घेतली. तसेच खरेदीखत तयार करून परस्पर ही जमीन उत्तुंग पाटील याच्या नावावर करून घेतली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पाटील याला अटक करून मंगळवारी (ता. 17) न्यायालयात हजर करण्यात आले होते. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. बनावट व्यक्ती कोण होत्या?, बनावटक कागदपत्रे कोठे तयार करून घेतली?, त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी, तसेच त्याचे आणखी कोणी साथीदार आहे का?, बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन नावावर करून ती इतर कोणाला विकली आहे का? याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव (Government Advocate Vijay Singh Jadhav) यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला 25 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे (hinjewadi police station) पोलिस उपनिरीक्षक एम. बी. गाढवे (PSI M. B. Gadhve) या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | 2.5 crore fraud in the name of land in Hinjewadi, Pune; Uttung Patil arrested

हे देखील वाचा :

Rupali Chakankar | ‘चंद्रकांतदादा आपलं जितकं वय आहे, तितकी शरद पवारांची संसदीय कारकीर्द आहे’ (व्हिडीओ)

Pimpri-Chinchwad Corporation | कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना PCMC देणार 10 हजारांऐवजी 25 हजारांची मदत

MNS | गेली 20 वर्षे महाराष्ट्र राष्ट्रवादीचे संकुचित राजकारण पाहतोय; मनसेचा पलटवार

Related Posts