IMPIMP

Pune Crime | कॉपी राईटच्या कारवाईची धमकी देऊन उकळली 2.65 लाखाची खंडणी, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून FIR

by Team Deccan Express
Pune Crime | Action taken against moneylenders in Rasta Peth who charge a fine of 15000 per day for defaulting on interest installments of Rs 5 lakh

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | ब्रॅण्डेड कपड्यांच्या (Branded Clothes) कंपनीचे ओरीजनल प्रोडक्ट न विकता फर्स्ट कॉपी (First Copy Sell) विकत असल्याने कारवाईची धमकी देऊन एक जण दुकानदाराकडून गेली 4 वर्षे दरमहा 15 हजार रुपये खंडणी (Ransom) उकळत असल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे. याप्रकरणी चेतन मोतीराम गनात्रा Chetan Motiram Ganatra (वय-46) याच्यावर गुन्हे शाखेच्या (Anti Extortion Cell) खंडणी विरोधी पथक (Anti Extortion Cell) दोनने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. आरोपी गनात्रा याच्यावर IPC 384, 385 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अभिषेक विलास बोर Abhishek Vilas Bore (वय-32 रा. महमंद वाडी -Mohammed Wadi) यांनी खंडणी विरोधी पथक दोनकडे तक्रार अर्ज केला होता. या तक्रार अर्जाची चौकशी करुन आरोपी चेतन गनात्रा (वय-46 रा. प्राधिकरण निगडी-Nigdi Pradhikaran ) याच्यावर मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार धनगंगा बिझनेस सेंटरमध्ये (Dhanganga Business Centre) 2 जुलै 2018 ते 12 मे 2022 दरम्यान घडला आहे.(Pune Crime).

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे धनगंगा बिझनेस सेंटरमध्ये कपड्यांचे दुकान आहे (Cloth Shop In Dhanganga Business Centre). चेतन गणात्रा हा त्यांच्या दुकानात आला. विकत असलेले कपडे हे ब्रॅण्डेड कपड्यांच्या कंपनीचे ओरीजनल प्रोडक्ट नसून ते फर्स्ट कॉपी असल्याचे सांगितले. तसेच आर डी बी प्रोफेशनल सर्व्हिसेस (RDB Professional Services) यांची पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी दाखविली. कारवाई करण्याची भिती दाखवून फिर्यादी यांच्याकडून प्रति महिना 15 हजार रुपयांचा हप्ता देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे त्याने दरमहा 15 हजार रुपये प्रमाणे आतापर्यंत 1 लाख 95 हजार रुपये घेतले व बँक खात्यावर 70 हजार रुपये असे एकूण 2 लाख 65 हजार रुपये खंडणी स्वरुपात स्वीकारले. अजूनही तो दर महा 15 हजार रुपये खंडणीची मागणी करत होता. अखेर आरोपीच्या त्रासाला वैतागून फिर्यादी यांनी खंडणी विरोधी पथक दोनकडे तक्रार अर्ज केला.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक- 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare),
पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan), पोलीस अंमलदार विजय गुरव,
शैलेश सुर्वे, प्रदिप शितोळे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, सैदाबा भोजराव, संग्राम शिनगारे,
अमोल पिलाने, प्रदिप गाडे, चेतन शिरोळकर, किशोर बर्गे, रवि संकपाळ, रुपाली कर्णवर, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime | 2.65 lakh ransom by threatening copyright action, FIR from Pune Police Crime Branch anti extortion cell

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts