IMPIMP

Pune Crime | दुबईहून पुणे विमानतळावर आलेल्या प्रवाशांकडून 466 जिवंत प्रवाळांचे नमुने जप्त; सीमा शुल्क विभागाची कारवाई

by nagesh
Pune Crime | 466 samples of live coral seized from passengers arriving at Pune Lohegaon International Airport from Dubai; Customs Department action

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | जिवंत प्रवाळाच्या तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. दुबईहून (Dubai) आलेल्या आणि ग्रीन चॅनलमधून जाण्याचा प्रयत्न करणा-या पुण्यातील लोहगाव (Pune Lohegaon Airport) आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Pune International Airport) 2 प्रवाशांच्या बॅगेत 466 जिवंत प्रवाळांचे नमुने आढळून आले. त्यानंतर ते जप्त करुन त्यांच्या पूनर्वसनासाठी मुंबईतील तारापोरवाला मत्स्यालयाकडे (Taraporewala Fisheries) सोपविण्यात आले आहेत. ही कारवाई सीमा शुल्क विभागाच्या (Customs Department) अधिकाऱ्यांनी केली आहे. (Pune Crime )

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

5 एप्रिल रोजी दुबईहून जेट एअरवेजच्या विमानाने नवी मुंबई (वय 32) आणि मुंबईमधील (वय 28) 2 तरुण पुणे विमानतळावर आले होते. त्यांनी ग्रीन चॅनल मधुन जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांच्याकडील बॅगांची कसून तपासणी करण्यात आली. त्यावेळी एका बॅगेमध्ये प्लॅस्टिकच्या बरण्यांत शंभर जिवंत प्रवाह आणि दुस-या बॅगेत प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये 366 जिवंत प्रवाह आढळून आलेत. यानंतर प्रवाह जप्त करण्यात आले आहे. (Pune Crime)

सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त धनंजय कदम (Dhananjay Kadam) यांनी सांगितले की,
”त्या दोघांकडे चौकशी केल्यावर त्यांनी व्यावसायिक कारणासाठी ते आणल्याचे मान्य केलेआहे.
दोघांकडे चौकशी करण्यात येत असून त्याची बाजारपेठेतील किंमतीची माहिती घेत असल्याचे,” ते म्हणाले.

Web Title :- Pune Crime | 466 samples of live coral seized from passengers arriving at Pune Lohegaon International Airport from Dubai; Customs Department action

हे देखील वाचा :

MSEDCL | …म्हणून सोमवारी पहाटे दोन तास विमाननगर, नगररोड, येरवड्यामध्ये वीज बंद

World Health Day | भाजपा महिला मोर्चा आणि बेनकेअर हॉस्पिटल यांच्या वतीने ‘जागतिक आरोग्य दिन’ उत्साहात साजरा

Pune-Mumbai Expressway Accident | पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कार-ट्रकचा भीषण अपघात; चौघे जागीच ठार

Related Posts