IMPIMP

Pune Crime | पोलिसांचा जुगार अड्यावर छापा, जुगार खेळणाऱ्या 5 जणांना रंगेहात पकडले

by nagesh
Pune Police Crime Branch News | Social Security Cell Pune raid on gambling den in Bundagarden area, action taken against 8 persons

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन   – पोलिसांनी जुगार अड्यावर (gambling den) छापा टाकून जुगार खेळणाऱ्या पाच जणांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई पुण्यातील (Pune Crime) खेड पोलिसांनी (Khed police station) खरपुडी खुर्द या ठिकाणी करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन 5 जणांना अटक (Arrest) केली. या कारवाईत (Pune Crime) पोलिसांनी 47 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

खेड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले (PSI Bharat Bhosale), पोलीस हवालदार संतोष घोलप (Police Constable Santosh Gholap) यांना खरपुडी खुर्द गावच्या हद्दीत खिंडीजवळ असणाऱ्या डोंगरावर गुलाब भागूजी गाडे (Gulab Bhaguji Gaade) यांच्या पोल्ट्री मधील शेडमध्ये काही लोक जुगार पैशावर खेळत आहेत.
माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या पाच जणांना अटक केली.

या कारवाईत नामदेव दाजी गाडे (वय-53), सत्यवान काळूराम गाडे (वय-45), शरद तुकाराम गाडे (वय-43), रुपेश पाराजी खंडागळे (वय-30), अजित शंकर गाडे
(वय-45 सर्व रा. खरपुडी खुर्द, ता. खेड) असे जुगार खेळताना रंगेहात (Pune Crime) पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी पोलीस हवालदार निखिल गिरिगोसावी (Nikhil Girigosavi) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुढील तपास पोलीस हवालदार शेखर भोईर (Shekhar Bhoir) करीत आहेत.

Web Title : Pune Crime | 5 gamblers caught red handed 47000 worth property confiscated in khed police station area

हे देखील वाचा :

Parbhani News | कर्ज मंजूर आणि वितरणास विलंब ! शेतकर्‍यांचे ‘त्या’ बँकेच्या विरोधात उपोषण

Shiba Inu Coin | 24 तासात ‘या’ क्रिप्टोकरन्सीमध्ये आली 45 टक्क्यांची ‘उच्चांकी’, जाणून घ्या कारण

Atul Bhatkhalkar | अमली पदार्थ तस्करीवरून भाजप नेत्याची टीका, म्हणाले – ‘…महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहेत काय?’ (व्हिडिओ)

Related Posts