IMPIMP

Pune Crime | 50 लाखाचे खंडणी प्रकरण ! RTI कार्यकर्ता सुधीर आल्हाटची रवानगी पोलिस कोठडीत

by bali123
Pune Crime | 50 lakh ransom case! RTI activist Sudhir Alhat sent to police custody

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | लेटरहेडवर डेक्कन पोलीस ठाण्यातील (Deccan Police Station) तत्कालीन पोलीस उपनिरीक्षकाच्या (PSI) विरोधात केलेला तक्रार (Pune Crime) अर्ज पाठीमागे घेण्यासाठी तक्रारदार महिलेकडे तब्बल 50 लाखांची खंडणी (Ransom) मागितल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Pune Police Crime Branch) माहिती अधिकार (RTI Activist) कार्यकर्ता सुधीर रामचंद्र आल्हाट (Sudhir Ramchandra Alhat) याला अटक (Arrest) केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने रविवार (दि.26) पर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.

खंडणी प्रकरणात सुधीर आल्हाट (वय-51 रा. नरविर तानाजी वाडी, साखर संकुल जवळ, शिवाजीनगर) याच्यासह सुभाष उर्फ अण्णा जेऊर (Subhash alias Anna Jeur), निलेश जगताप (Nilesh Jagtap), विवेक कोंडे (Vivek Konde) यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 48 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

अटक करण्यात आलेल्या आरोपी फरार आरोपींचा मोबाईल क्रमांक, त्यांचा पत्ता आणि ठाव ठिकाणा याबबत तपास करायचा आहे. तसेच आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याने त्याची चौकशी करायची आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार (Criminal) असून त्याच्यावर इतर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून त्या बाबत तपास करायचा असल्याने पोलिसांनी न्यायालयाकडे चार दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने आरोपीला रविवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title : Pune Crime | 50 lakh ransom case! RTI activist Sudhir Alhat sent to police custody

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

हे देखील वाचा :

Related Posts