IMPIMP

Pune Crime | गँगस्टर नीलेश घायवळ टोळीतील कुख्यात पप्पू तावरे खून प्रकरणात गजानन मारणे गँगच्या 8 जणांची निर्दोष मुक्तता

by bali123
HC On Minor Girl Rape Case | 'Intercourse with the consent of a minor girl is rape' - Delhi High Court

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन पुण्यातील (Pune Crime) नीलेश घायवळ टोळी (Nilesh Ghaiwal Gang) सदस्य आणि जांभळी गावचा माजी उपसरपंच पप्पू उर्फ गोरक्ष गोपीनाथ तावरे Pappu alias Goraksh Gopinath Taware (वय-35) याचा खून (Murder in Pune) करण्यात आला होता. या गुन्ह्यातील गजा मारणे टोळीतील (Gajanan Marne Gang) 8 जणांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यापैकी 3 जण आठ वर्षापासून तुरुंगात होते. सत्र न्यायाधीश नांदेडकर (Sessions Judge Nandedkar) यांनी शुक्रवारी (दि.24) हा आदेश दिला. (Pune Crime)

या प्रकरणात 13 जणांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यापैकी फिर्यादी असलेल्या मयताच्या पत्नीसह सात जण फितुर झाले. ही घटना पुण्यातील (Pune Crime) हवेली तालुक्यातील जांभळी गावच्या हद्दीत 8 डिसेंबर 2013 रोजी घडली होती.

ज्ञानेश्वर पाडुरंग तावरे (Dnyaneshwar Padurang Taware), निखिल राजेंद्र पोटघन (Nikhil Rajendra Potghan), अनिल दगडू भगत (Anil Dagdu Bhagat), प्रविण उर्फ पप्पू तुकाराम पासलकर (Pravin alias Pappu Tukaram Pasalkar), रुपेश नातू तावरे (Rupesh Natu Taware), रामदास रघुनाथ पवार (Ramdas Raghunath Pawar), आकाश साहू शिंदे (Akash Sahu Shinde) आणि अक्षय राजेश जोरी (Akshay Rajesh Jori) अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्यांची नावे आहे. तर तुषार तुकाराम पासलकर (Tushar Tukaram Pasalkar) आणि पिंटू तुकाराम पासलकर (Pintu Tukaram Pasalkar) हे अद्याप फरार असल्याची माहिती अॅड. राहुल भरेकर (Adv. Rahul Bharekar) यांनी दिली. पप्पू पासलकर, रुपेश तावरे आणि अनिल भगत हे 2014 पासून जेल मध्ये होते. तर उर्वरीत आरोपी 2014 मध्ये जामिनावर (bail) बाहेर आले होते. (Pune Crime)

बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. सुधीर शहा (Adv. Sudhir Shah), अ‍ॅड. जितेंद्र सावंत (Adv. Jitendra Sawant),
अ‍ॅड. राहुल भरेकर, अ‍ॅड. अनिकेत येवले (Adv. Aniket Yeolale), अ‍ॅड. संग्राम काटे (Adv. Sangram Kate)
आणि अ‍ॅड. वैभव मेदणकर (Adv. Vaibhav Medankar) यांनी काम पाहिले.
मयत तावरे हा जांभळी गाव आणि परिसरात आरोपींना दहशत पसरविण्यात आणि खंडणी उकळण्यास विरोध करत होता.
या कारणावरुन आणि पूर्ववैमनस्यातून काठी, कोयत्याने माराहाण करुन गोळ्या (firing) घालून खून केल्याचा आरोप सर्वांवर होता.
या प्रकरणाचा निकाल आठ वर्षांनी लागला असून आठ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

Web Title : Pune Crime | 8 members of gangster Gajanan Marne gang’s acquitted in Nilesh Ghaiwal gangs notorious Pappu Taware murder case

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

हे देखील वाचा :

Related Posts