IMPIMP

Pune Crime | क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून आरोपींनी मुलीला घराबाहेर काढून केले विकृत कृत्य

by nagesh
Pune Crime | 22 year old girl molested after entering call center in Kalyaninagar, Pune

पुणे / तळेगाव दाभाडे : सरकारसत्ता ऑनलाइन पुण्यातील (Pune Crime) तळेगाव दाभाडे येथे एका मुलीला घराबाहेर काढून तिच्यासोबत काही जणांनी विकृत कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेट (Cricket) खेळताना झालेल्या वादातून चार जणांनी मायलेकीला मारहाण (Beating) करुन त्यांच्यासोबत गैरवर्तन केले. हा प्रकार पुण्यातील (Pune Crime) मावळ तालुक्यातील इंदोरी गावच्या हद्दीत 1 नोव्हेंबर रोजी घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Talegaon MIDC Police Station) फिर्याद दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

पोलिसांनी नंदकुमार कुसळ, मंदा कुसळ, स्वाती कुसळ आणि कोमल कुसळ (सर्व रा. इंदोरी, ता. मावळ) यांच्यावर विनयभंगासह विवध कलमांतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नंदकुमार कुसळ यांची मुलं इतर मुलांसोबत घराच्या परिसरात क्रिकेट खेळत होती.
क्रिकेट खेळताना मुलांचा चेंडू फिर्यादी (Pune Crime) महिलेला लागला. त्यामुळे फिर्यादी महिलेने चेंडू आपल्या ताब्यात घेतला.

यामुळे चिडलेल्या आरोपींनी फिर्यादी महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसत तिच्या मुलीला घराबाहेर काढून बेदम मारहाण केली.
तसेच आरोपींनी पीडित मुलीला शिवीगाळ करत तिच्या मनास लज्जा उत्पन्न (Pune Crime) होईल, असं कृत्य केलं आहे.
आरोपी नंदकुमार याने पीडित मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप फिर्यादी महिलेने तक्रारीत केला आहे.
महिलेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी विनयभंग, मारहाण आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : Pune Crime | complainant and her daughter beaten and abused by 4 people dispute over cricket ball talegaon dabhade

हे देखील वाचा :

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार

EPFO | आयुष्यभर दरमहा मिळेल पेन्शन ! कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेत असा करा ऑनलाइन अर्ज

Online gambling | काय सांगता ! होय, चक्क बँक मॅनेजरनेच जुगारात उडवले ग्राहकांचे कोट्यावधी रुपये

Related Posts