Pune Crime Court News | पुणे : किरकोळ वादावरून झालेल्या खुनाच्या गुन्ह्यांतील आरोपीची निर्दोष मुक्तता

Crime Court News | Sarpanch Gajanan Shende, accused in the fraud case, acquitted; Ghatanji court verdict
December 31, 2024

पुणे : Pune Crime Court News | दिनांक- १५/०१/२०१७ रोजी हॉटेलं लेक व्हिला, कुडजे येथे दारु पित असाताना अनोळखी दोन इसमाबरोबर बाचाबाची झाली त्यातून आरोपी याने मयतावर चाकूने वार करून त्याचे डोके जमिनीवर आपटून त्यास मारले. त्यानंतर तो मयत झाला. सदर केस मधून आरोपीची सबळ पुरावा नसल्याने निर्दोष मुक्तता करण्यात आली. या बाबतचे आदेश मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन यांनी दिले आहेत. अशी माहिती ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर (Adv. Jitendra Ashok Janapurkar) यांनी दिली. संदीप मोहन सावंत (रा- एन डी ए पोलिस चौकी मागे, इंदिरा वसाहत, उत्तम नगर, पुणे) असे निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, सदर केस ही उत्तम नगर पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हा रजि. नंबर ४/१७ भा द वि कलम ३०२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर केस मधील फिर्यादी हा मयत चा मित्र असून तो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. तसेच फिर्यादीच्या फिर्यादनुसार दिनांक- १५/०१/२०१७ रोजी संध्याकाळी ०७/०० वाजताचे सुमारास फिर्यादी घरी असताना त्याचा मित्र चंद्रशेखर ऊर्फ शेखर नरहरी सलगरकर रा- मासे आळी, उत्तमनगर, पुणे. याचा Try to call असा एसएमएस आल्याने फिर्यादी त्यास कॉल केला असता त्याने सागितले की, मी तुझ्या घराजवळ आलो आहे मला भेटण्यासाठी आहिरेगेट येथील लाजवंती मोबाईल शॉपीजवळ ये. त्याप्रमाणे फिर्यादी तेथे गेला असता तो दिसला नाही म्हणून परत त्यास कॉल केला असता तो दोन मिनीटात त्याचे मित्राचे अॅक्टीव्हावर आला व त्याने विचारले की तुझा काय प्रोग्राम आहे. तेंव्हा फिर्यादी म्हणाला की लेक व्हीला हॉटेलला चाललो आहे तेंव्हा तो तो मित्र म्हणाला की चल मी पण येतो. त्यानंतर त्याने फिर्यादीला त्याचे मागे मागे येण्यास सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी त्याचे मोटार सायकल मागे भिमनगरं कोंढवे धावडे पर्यन्त गेले. तेथे त्याचे मित्राचे अॅक्टीव्हावरुन खाली उतरुन फिर्यादीच्या सीबीझेड मोटार सायकलवर बसला दोघे लेक व्हीला हॉटेल कुंडजे येथे सुमारे रात्री ०८/०० वाजता गेले. गाडी पार्क करत असताना फिर्यादीच्या ओळखीचे कुणाल विजय कांबळे, विनोद विलासं सुतार हे भेटले व सर्वजण आत मध्ये गेले. कुणाल आणि विनोद हे लॉनमध्ये बसले, फिर्यादी व शेखर हॉटेलच्या कॉटेजमध्यें ‘दारु पित बसले. कॉटेजच्या बाहेर लॉनवर आणखीन दोन इसम दारु पित होते. काहीवेळा नंतर ते दोन इसम त्यांचे मोबाईलवर कोणासतरी मोठ मोठ्याने शिवीगाळ क्रत होते. म्हणुन शेखर दारु पिता पिता १०/३० वाजण्याचे सुमारास कॉटेजच्या बाहेर गेला व त्या इसमांना काहीतरी बोलून परत आला, त्याचे मागे ते इसम आमचे कॉटेजजवळ आले व तु आमच्या मध्ये बोलणारा कोण? असे म्हणून शेखरला आले शिवीगाळ करु लागले तेंव्हा हॉटेलचा मॅनेजर येथे आला व त्या इसमांना घेवून गेला. त्यावर फिर्यादी शेखरला ते इसम तुला का शिवीगाळ करत होते तु काय केले? त्यावर शेखर म्हणाला मी काही केले नाही. नंतर रात्रीचे ११/०० ते ११/१५ वा. चे सुमारास आमचे बिल झाले ते बाहेर पडले. तेवढयात लॉन मध्ये बसलेले ते दोन अनोळखी इसम शेखरजवळ आले. त्यांनी शेखरला भांडण्यास सुरुवात केली. तेंव्हा फिर्यादी शेखरला घरी चलण्यासाठी हाताला धरुन ओढत होतो. परंतू शेखर फिर्यादीचे ऐकत नव्हता व फिर्यादीला जा असे म्हणाला. मयत ऐकत नव्हता म्हणुन फिर्यादी तेथून माझ्या सीबीझेड मोटार सायकलवरुन घरी निघुन गेला. त्यानंतर दुसऱ्यादिवशी सकाळी तेथून काम करायला जाणारे इसमानी पोलिस स्टेशन ला मयत इसमाबद्दल खबर दिली आणि अनोळखी इसमाविरुध तक्रार दाखल करण्यात आली.
या केस मध्ये सरकार पक्षातर्फे एकूण १६ साक्षीदार तपासण्यात आले. त्याचप्रमाणे ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांनी केस चालवली सर्व साक्षीदाराची उलटतपासणी घेऊन अंतिम युक्तिवाद केला. सर्व बाबी लक्षात घेता आरोपीविरुध सबळ पुरावा नसल्याच्या अभावी न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. तसेच या केसमध्ये ॲड. आनंद चव्हाण, ऋषिकेश पाटील, ॲड. मयूर चौधरी, ॲड. राजा पारधे यांनी मदत केली.