IMPIMP

Pune Crime | आयटी कंपनीच्या मालकाकडून 9 लाखाची खंडणी घेणाऱ्या कुख्यात गजा मारणे टोळीच्या हस्तकाला गुन्हे शाखेकडून अटक

by nagesh
Pune Crime | 21 kg cannabis seized from Pune Police Crime Branch Anti-Narcotics Cell, one arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) एका आयटी कंपनीच्या मालकाकडून (IT Company Owner) 9 लाखाची खंडणी (Ransom) उकळणाऱ्या कुख्यात गजा मारणे टोळीच्या (Gangstar Gaja Marne) हस्तकाला पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनच्या (Anti Extortion Cell) पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. अटक (Arrest) करण्यात आलेला सराईत गुन्हेगार पुण्यात (Pune Crime) गाजलेल्या एका खून प्रकरणातील आरोपी असल्याची माहिती मिळत असून तो सध्या जेलमधून बाहेर आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.9) रात्री साडे आठच्या सुमारास कॅम्प रोडवरील (camp road) डायमंड क्वीन हॉटेलजवळ केली.

तुषार बाळासाहेब बधे Tushar Balasaheb Badhe (रा. सुयश अपार्टमेंट, ए बिल्डिंग प्लॅट नं.1, त्रिमूर्ती हॉस्पिटल मागे, सिंहगड रोड, धायरी) असे खंडणीची रक्कम घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी आयटी व्यावसायिकाने खंडणी विरोधी पथक दोनकडे तक्रार केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिकाची आयटी कंपनी होती.
मात्र, कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Corona Lockdown) कंपनी बंद पडली होती. त्यामुळे त्यांनी एसबीआय बँकेचे (SBI Bank) लोन प्रोसेसिंग व कस्टमरचे लोकांची प्रोसेसिंगची कागदपत्रे बँकेत जमा करण्याचे काम करत होते.
दरम्यान, एकाने फिर्यादीला लोन फाईल पुर्ण करुन देण्यासाठी 3 लाख 50 हजार रुपये दिले होते.
मात्र, फाईलमध्ये त्रुटी असल्याने लोनची फाईल बँकेने रिजेक्ट केली.

लोन फाईल रिजेक्ट झाल्याने तुपे यांनी फिर्यादी यांच्याकडे लोन प्रोसेसिंगसाठी (Loan processing) दिलेले पैसे परत मागितले.
फिर्यादी यांनी 75 हजार रुपये देऊन उवर्वरीत रक्कम थोडे थोडे करुन देतो असे सांगितले होते.
दरम्यान अटक करण्यात आलेला आरोपी तुषार बधे हा खुनाच्या गुन्ह्यातून (Murder Case) बाहेर आला होता.
त्याने तक्रारदार यांना धमकी देऊन वाल्मिकी तुपे हा आपला भाऊ असून त्याचे पैसे दे, अन्यथा घरातील सामान घेऊन जाण्याची धमकी दिली.
तसेच अहिवळे यांच्या वयस्कर आईला घराबाहेर काढण्याची धमकी दिली.
आरोपीने अहिवळे यांना वारंवार फोन करुन 9 लाखांची खंडणी मागितली.
अखेर आरोपीच्या धमक्यांना वैतागून अहिवळे यांनी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली.

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने गुरुवारी रात्री कॅम्परोड येथे सापळा रचून आरोपी तुषार बधे याला फिर्यादी यांच्याकडून 9 लाखांच्या खंडणीची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले.
तुषार बधे याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) भा.दं.वि. कलम 384,385,386,504,506 अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली.
आरोपी तुषार बधे हा गुंड अमोल बधे खून प्रकरणातील (Amol Badhe Murder Case)
आरोपी असून कुख्यात गुंड गजा मारणेशी (Gajanan Marne) संबंधित गुन्हेगार आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate) यांच्या मार्गदार्शनाखाली खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare), पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan), पोलीस अंमलदार संपत अवचरे, शैलेश सुर्वे, सुरेंद्र जगदाळे, विनोद साळुंके, सौदाबा भोजराव, सचिन अहिवळे, संग्राम शिनगारे, प्रविण पडवळ, प्रदीप गाडे, मोहन येलपल्ले, चेतन शिरोळकर, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime | Crime Branch arrests ringleader of IT company owner’s Rs 9 lakh ransom

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

हे देखील वाचा :-

Crime News | स्विमिंग पूलमध्ये महिला पोलिसासोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलिस उपाधीक्षकाला अटक

Ajit Pawar | … तरच महाविकास आघाडीला निवडणुकांमध्ये यश मिळेल – अजित पवार

India vs England 5th test | …म्हणून भारत विरुद्ध इंग्लंड 5 वी कसोटी रद्द; इंग्लंड विजयी घोषित

Related Posts