IMPIMP

Pune Crime | हॉटेलमध्ये शिरुन तोडफोड करीत उकळली खंडणी; दरमहा हप्ता व फुकट दारुची मागणी करणार्‍या गुंडावर गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | Crime of extortion against a moneylender; FIR against Shubham Jadhav and Ashish (Ashok) Gaikwad at Chandannagar Police Station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | शिवणे (Shivne, Pune) येथील हॉटेलमध्ये शिरुन दरमहा ५ हजार रुपये हप्त्याची मागणी करुन हॉटेलमध्ये तोडफोड करुन दहशत निर्माण करीत खंडणी (Extortion) उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी (Uttamnagar Police) गणेश शिंदे (Ganesh Shinde) याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत तुकाराम सोपान इंगळे Tukaram Sopan Ingle (वय ५५, रा. शिवणे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९७/२२) दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे शिवणे येथे अ‍ॅपल रेस्टो बार (Apple Resto Bar) आहे.
गणेश शिंदे हा शुक्रवारी रात्री बारमध्ये आला. त्याने फिर्यादी यांना दरमहा ५ हजार रुपये हप्ता पाहिजे व फुकट दारू पाहिजे, अशी मागणी केली.
फिर्यादी यांनी नकार दिल्याने त्याने बारमध्ये तोडफोड करुन मॅनेजरला शिवीगाळ करुन मारहाण (Beating) केली.
तसेच बार मधील ग्राहकांना शिवीगाळ करुन खल्लास करण्याची धमकी (Threat) दिली.
खुर्च्या व दारुच्या बाटल्यांची तोडफोड केल्याने ग्राहक पळून गेले.
त्यानंतर शनिवारी दुपारी शिवणे येथील गावडे केक शॉपसमोर (Gawde Cake Shop) फिर्यादी यांना भेटून त्याने पुन्हा दरमहा ५ हजार रुपये हप्ता व फुकट दारुची मागणी केली.
तेव्हा त्याला शांत करण्यासाठी फिर्यादी यांनी २ हजार रुपये दिले.
दरमहा हप्ता व फुकट दारु दिली नाही तर घरात घुसुन जीवे ठार मारण्याची धमकी (Threats To Kill) दिली.
त्यामुळे त्यांनी घाबरुन पोलिसांकडे धाव घेतली असून सहायक पोलीस निरीक्षक रोकडे (Assistant Police Inspector Rokade) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Extorted ransom by breaking into the hotel A case has been filed against
the goon who demanded monthly installments and free liquor

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Pune News | ‘शिक्षण हे हुशार होण्याकरिता नसून शहाणे होण्याकरिता असावे’ – डॉ. दिपक शहा

MLA Ravi Rana On Bhagat Singh Koshyari | ‘राज्यपाल एक सरळ, सज्जन व्यक्तिमत्व’ – आमदार रवी राणा

NCP Chief Sharad Pawar On Bhagat Singh Koshyari | कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Related Posts