IMPIMP

Pune Crime | ‘शारीरिक संबंध ठेव नाहीतर नवऱ्याला ठार मारेन..’ विवाहतेनं संपवलं जीवन; 26 वर्षीय युवकास 5 वर्षे सक्तमजुरी

by Team Deccan Express
Sangli Crime | Five women sentenced for attacking police squad

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | विवाहितेकडे शारीरिक संबंधाची मागणी करून ती पूर्ण न केल्यास किंवा भेट अथवा फोन न केल्यास पतीला ठार मारण्याची धमकी देत मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्येस (Suicide) प्रवृत्त केल्याप्रकरणी एका युवकाला कोर्टाने 5 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा (Pune Crime) सुनावली आहे. प्रमोद निवृत्ती औसरमल (Pramod Nivruti Ausarmal) (वय 26, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. सोनाली तुषार क्षीरसागर (Sonali Tushar Kshirsagar) (रा. येरवडा) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली. (Pune Shivaji Nagar Court)

याबाबत माहिती अशी की, 2011 ते 2012 दरम्यान ही घटना घडली आहे. फिर्यादी यांच्या मुलीचे येथील तुषार नावाच्या मुलाशी लग्न झाले होते. त्यांच्या संसार सुखात चालला होता. अशातच आरोपी प्रमोद हा सोनाली हिला दिलेल्या फोनवर फोन करत जा तसेच शरीरसंबंध ठेवण्याची मागणी करू लागला. मागणी मान्य न केल्यास पतीला काहीही सांगून तुझी बदनामी करेन तसेच भेटली किंवा फोन केला नाही तर पतीला ठार मारून टाकेल, अशी धमकी दिली. दरम्यान यानंतर आरोपीला होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर सोनालीने 29 एप्रिल 2012 रोजी राहत्या घऱी स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या (Suicide) केली. असे फिर्यादीत सांगितलं. (Pune Crime)

दरम्यान, याप्रकरणी आरोपी प्रमोदला अटक (Arrested) करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकार वकील शुभांगी देशमुख (Lawyer Shubhangi Deshmukh) यांनी काम पाहिले.
या प्रकरणात त्यांनी 10 साक्षीदार तपासले. यात, फिर्यादीची साक्ष व पीडितेने लिहिलेली चिठ्ठी महत्त्वाचा पुरावा ठरला.
या पुराव्यानुसार कोर्टाने आरोपीला 5 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
त्याचबरोबर दंड न भरल्यास अतिरिक्त 6 महिन्याचा साधा कारावास भोगावा लागेल, असं देखील न्यायालयाने म्हटलं आहे.

Web Title : Pune Crime | five years hard labor for a young man in case of marital death pune shivaji nagar court

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts