IMPIMP

Pune Crime | कबुतर चोरल्याच्या संशयावरुन अल्पवयीन मुलासोबत केलं भयंकर कृत्य

by nagesh
Pune Crime | in pune a minor was beaten up for stealing a pigeon

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन कबुतर चोरल्याच्या (Stealing Pigeon) संशयावरून अल्पवयीन मुलाला बॅट आणि पट्ट्याने जबर मारहाण (Beating) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune Crime) घडला आहे. हा सर्व प्रकार मारहाण करणाऱ्या मुलांनीच सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल केला. हा प्रकार बुधवारी (दि.16) दुपारी पुण्यातील (Pune Crime) येरवडा पोलीस ठाण्याच्या (Yerawada Police Station) हद्दीत घडला असून याबाबत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी रात्री उशिरा पालकांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. येरवड्यातील गोल्फ क्लब (Golf Club Yerwada) जवळ असणाऱ्या औद्योगिक वसाहती (Industrial Estate) समोरच्या पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) अनुसयाबाई सावंत शाळेच्या आवारात हि घटना घडली. बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एका अल्पवयीन बालकाला इतर दोन मुले कबूतर चोरल्याच्या वादातून पट्ट्याने बॅटने बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ त्यांच्या तिसऱ्या साथीदाराने काढला. बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पालकांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली. याप्रकरणी जखमी मुलाची वैद्यकीय तपासणी (Medical Examination) करुन अहवाल मिळाल्यानंतर गुरुवारी (दि.17) सकाळी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.(Pune Crime)

मारहाण झाल्यानंतर पीडित मुलाने घरच्यांना याबाबत काहीच सांगितले नाही.
मात्र, ज्यावेळी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर हा सर्व प्रकार घरच्यांच्या समोर आला. या गंभीर प्रकरणानंतर पुणे महापालिका शाळांच्या आवारातील सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. या प्रकरणात येरवडा पोलीस (Yerawada Police) कोणता गुन्हा दाखल करतात हे पहावे लागले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | in pune a minor was beaten up for stealing a pigeon

हे देखील वाचा :

Sanjay Raut | संजय राऊतांचा भाजपला रोखठोक इशारा, ‘उखाडना है तो उखाड लो’

HDFC, SBI Interest Rate | SBI, HDFC बँकेच्या ग्राहकांना आनंदाची बातमी, मिळणार मोठा फायदा

How To Relieve Stress Quickly | चुटकीसरशी गायब करायचा असेल ‘स्ट्रेस’ तर जाणून घ्या तणाव दूर करण्याच्या 7 सोप्या पद्धती

Weight Loss Kadha | वजन कंट्रोल करण्यासाठी परिणामकारक आहे ‘हा’ एक काढा

Nana Patole | ‘सरकारमध्ये जे चालले आहे त्याला दुरुस्त करण्याची वेळ आली’; सरकार बदलणार की सरकारमध्ये बदल?

Related Posts