IMPIMP

Pune Crime | लाल महालात ‘लावणी’ करणे पडले महागात ! नृत्यांगणा वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

by Team Deccan Express
Pune Crime | It was expensive to do Lavni dance in Lal Mahal pune ! A case has been registered against four persons including dancer Vaishnavi Patil

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन   Pune Crime | लाल महालाचे (Lal Mahal Pune) आतील मोकळ्या जागेत लावणी नृत्य (Lavni Dance) करुन त्याचा व्हिडिओ व्हायरल करणे सेलेब्रिटी वैष्णवी पाटील (Vaishnavi Patil) हिला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी (Faraskhana Police) गुन्हा (FIR) दाखल केला (Pune Crime) आहे.

लाल महालाचे रखवालदार राकेश सोनवणे Rakesh Sonawane (वय ३७, रा. मंगळवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८१/२२) दिली आहे. त्यानुसार वैष्णवी पाटील, एक महिला आणि दोन पुरुषांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १६ एप्रिल २०२२ रोजी लाल महालात घडला होता.

वैष्णवी पाटील हिने लाल महालाचे आतील मोकळ्या जागेत लावणी नृत्य केले व इतरांनी ते मोबाईलमध्ये शुटींग करुन त्याचा व्हिडिओ फेसबुकवर (Facebook) व्हायरल केला. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) व राजमाता जिजाऊ (Rajmata Jijau) यांना मानणार्‍या सर्व समाजाच्या भावना दुखावल्या आहे. त्यामुळे लाल महाल या पवित्र वास्तूचे पावित्र्य भंग केले. फिर्यादी यांनी लावणी नृत्य व त्याचे शुटींग करण्यापासून रोखले असताना फिर्यादी यांना त्यांचे काम करु दिले नाही, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

वैष्णवी पाटील हिचा हा व्हिडिओ व्हायरल (Video viral) झाल्यानंतर त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) निषेध करुन शनिवारी सकाळी लाल महालासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
संभाजी ब्रिगेडनेही (Sambhaji Brigade) पोलीस आयुक्तांना (Commissioner Of Police Pune) निवेदन दिले होते.
त्यानंतर आता पोलिसांनी वैष्णवी पाटील हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title : Pune Crime | It was expensive to do Lavni dance in Lal Mahal pune !A case has been registered against four persons including dancer Vaishnavi Patil

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts