IMPIMP

Pune Crime | पुण्याच्या कोथरूड परिसरातील सराईत अविनाश कांबळे व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 79 वी कारवाई

by Team Deccan Express
Pune Crime | MCOCA action against Avinash Kamble and his gang in Kothrud area of Pune 79th action of Commissioner Amitabh Gupta till date

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरातील गुन्हेगारावर (Pune Crime) आळा घालण्यासाठी आणि शहरात कायदा सुव्यवस्था (Law and Order) टिकून ठेवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा (MCOCA Action) Mokka बडगा कायम ठेवत आतापर्यंत 79 टोळ्याविरुद्ध कारवाई करुन गुन्हेगारांची रवानगी कारागृहात केली आहे. पुण्यातील (Pune Crime) कोथरुड पोलीस ठाण्याच्या (Kothrud Police Station) हद्दीत दहशत पसरवणारा कुख्यात गुन्हेगार अविनाश राजेंद्र कांबळे (Avinash Rajendra Kamble) व त्याच्या टोळीवर पुणे पोलीस (Pune Police) आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली. आहे. आयुक्तांनी आजपर्यंत 79 आणि चालु वर्षात 16 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे. (Pune Police MCOCA Action On Criminals)

टोळी प्रमुख अविनाश राजेंद्र कांबळे व त्याचे साथीदार आणि कोथरुड पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार रवी ज्ञानेश्वर बोत्रे (Ravi Dnyaneshwar Botre), किरण ज्ञानेश्वर बोत्रे (Kiran Dnyaneshwar Botre) (दोघे रा. श्रावणधारा वसाहत, कोथरुड), सुरज उर्फ सोन्या राम कुडले Suraj alias Sonya Ram Kudle (वय – 31 रा. शेडगेआळी, भुगाव, पुणे) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

आरोपी अविनाश कांबळे आणि त्याच्या 3 साथीदारांनी कोथरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी पुणे शहर (Pune Crime) व परिसरात दहशत निर्माण कली आहे. या टोळीने खुन (Murder), खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), गंभीर दुखापत करणे, शस्त्र बाळगणे, जबरी चोरी, घरफोडी (Burglary), नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे, नागरिकांना मारहाण करुन जखमी करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केले आहेत. (Pune Crime)

आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांच्यात सुधारणा झाली नाही. आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचा प्रस्ताव कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप (Senior Police Inspector Mahendra Jagtap) यांनी पोलीस उपायुक्त परीमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड (DCP Pournima Gaikwad) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale) यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मंजूरी दिल्याने आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास कोथरुड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे (Kothrud Division ACP Rukmini Galande) करीत आहेत. (Police Action Pune Criminals)

आयुक्तांची 79 वी मोक्का कारवाई

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 79 तर चालु वर्षात 16 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड,
सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप,
पोलीस निरीक्षक गुन्हे बाळासाहेब बडे (Police Inspector Balasaheb Bade),
पोलीस उपनिरीक्षक किसन राठोड (PSI Kisan Rathod), पोलीस अंमलदार भास्कर बुचडे, अजय सावंत, अनिल बारड यांनी केली.

Web Title :- Pune Crime | MCOCA action against Avinash Kamble and his gang in Kothrud area of Pune
79th action of Commissioner Amitabh Gupta till date

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts