IMPIMP

Pune Crime News | तरुणीकडून ‘पाकिस्तान जिंदाबाद’ च्या घोषणा देणारी पोस्ट शेअर, पुण्यात खळबळ; गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

Pune Crime News | Attempted robbery at Canara Bank in Manjari! Villagers wake up, robbery attempt foiled, cash and gold safe
May 9, 2025

पुणे : Pune Crime News | पहलगाम हल्ल्यानंतर भारत – पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांकडून हल्ले केले जात आहेत. अशातच पुण्यात वास्तव्यास असलेल्या एका तरुणीने सोशल मीडियावर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ च्या घोषणा देणारी पोस्ट शेअर केल्याने खळबळ उडाली आहे.

सकल हिंदू समाजाने ही माहिती ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करत याप्रकरणी कारवाईची मागणी केली. या पोस्टमुळे संतापाची लाट उसळली असून, कोंढवा पोलिस ठाण्यात तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

सकल हिंदू समाजाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात शिक्षण घेणारी ही तरुणी तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट लिहीत होती. तिने ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा लिहिल्याचा दावा करण्यात आला आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर तिने तिचे इंस्टाग्राम अकाउंट डिलीट केले.

कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक पाटणकर यांनी म्हंटले की, ” या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, तपासाला सुरुवात झाली आहे.” या प्रकरणामुळे पुण्यातील सामाजिक वातावरण तणावपूर्ण बनले असून, पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.