Pune Crime News | बंगलुरुहून थेट पुण्यात आलेल्या बांगलादेशी महिला पोलिसांच्या ताब्यात; भारतातच करुन मिळाली बनावट कागदपत्रे

पुणे : Pune Crime News | बंगलुरहून रेल्वेने थेट पुण्यात आलेल्या बांगला देशी महिलेला पुणे पोलिसांनी (Pune Police) ताब्यात घेतले असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुसलामिया अब्दुल अजिज प्यादा (वय २७, रा. पश्चिम कोलागासिया, थाना आमतुली, जि. बोरगुना, बुलिशाखाली, बांगला देश) असे या महिलेचे नाव आहे.
याबाबत पोलीस अंमलदार भाग्यश्री सागर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसलामिया ही बांगला देशाची नागरिक आहे. तिचे शिक्षण ८ वीपर्यंत झाले आहे. बंगलोरहून रेल्वे ती मंगळवारी पुण्यात उतरली. त्यानंतर ती रेल्वे स्टेशनवरील (Pune Railway Station) प्लॅटफॉर्म नं. ६ च्या बाहेर असलेल्या रिक्षा स्टँडजवळ घुटमळत होती. तिला बांगली भाषेशिवाय इतर कोणती भाषा येत नव्हती. रिक्षा स्टँडपाशी बराच वेळ थांबल्यामुळे तिची माहिती बंडगार्डन पोलिसांना मिळाली.
दामिनी पथकातील (Damini Pathak Pune) महिला तातडीने तेथे पोहचल्या. त्यांनी मुसलामिया हिच्याकडे चौकशी केली. तिला बंडगार्डन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. अधिक चौकशीत तिने आपण बांगला देशातून कोलकत्ता येथे पोहचलो. तेथे आपल्याला बनावट कागदपत्रे तयार करुन देण्यात आली. तेथून आपण विमानाने बंगलोर येथे गेलो. पण तेथे बरेच दिवस काम मिळाले नाही. त्यामुळे पुण्यात काम मिळेल, असे समजल्याने पुण्यात आलो, असे सांगितले. भारतात प्रवेश करण्यासंबंधीच्या कोणत्याही वैध कागदपत्राशिवाय तसेच भारत बांगला देश सीमेवरील स्थानिक मुलकी अधिकार्यांचे परवानगी शिवाय बांगला देशातून भारताच्या सरहद्दीमध्ये प्रवेश केल्याने तिच्यावर बांगला देशातील घुसखोर नागरिक असल्याची खात्री झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक मुजावर तपास करीत आहेत.
Comments are closed.