Pune Crime News | पुणे : इन्स्टाग्रामवर न्यूड फोटो तयार करुन ते व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी

पुणे : Pune Crime News | महिलाचे फोटो व नाव वापरुन इन्स्टाग्र्राम आय डी तयार करुन त्यांचे फोटो व इन्स्टाग्राम आयडी डिलीट करण्यासाठी पैसे मागण्यात आले. पैसे दिले नाही तर फॉटो मॉफिं केलेले न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. तरीही पैसे न दिल्याने या महिलेच्या भावाला मॉफींग केलेले फोटो पाठविले होते. त्याचा शोध घेऊन वानवडी पोलिसांनी त्याला पकडले. (Molestation Case)
रघुवर बलराम चौधरी (वय १९, रा. शिंदे वस्ती, हडपसर, मुळ रा. बिहार) असे गुन्हेगाराचे नाव आहे.
रघुवर चौधरी याने पिडित महिलेचा फोटो व नाव वापरुन इन्ट्राग्राम वर आय डी तयार केला. त्याने फोटो व इन्स्टाग्राम आय डी डिलिट करण्यासाठी २ हजार रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिले नाही तर फोटो मॉफिंग करुन न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. या महिलेने त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले. पैस न दिल्याने त्याने या महिलेच्या भावाचे इन्स्टाग्राम वर मॉफींग केलेले या महिलेचे न्यूड फोटो पाठविले व आणखी फोटो पाठवायचे नसेल तर इन्स्टाग्रामवर मॅसेज करुन पैशांची वारंवार मागणी केली.
ही फिर्याद मिळाल्यावर वानवडी सायबर पथकातील पोलीस हवालदार अमोल पिलाणे, अतुल गायकवाड यांनी त्याबाबत सोशल मीडियावरुन माहिती प्राप्त करुन रघुवर चौधरीचे नाव निष्पन्न केले. त्याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडील मोबाईलची पाहणी केल्यावर त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोविंद जाधव, पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव, पोलीस अंमलदार पिलाणे, अतुल गायकवाड, सर्फराज देशमुख, सोमनाथ कांबळे व सुजाता फुलसुंदर यांनी केली आहे,
Comments are closed.