IMPIMP

Pune Crime | पिंपरी-चिंचवड पोलीस भरती परीक्षा ! मास्क कॉपी प्रकरणात परीक्षार्थीसह पोलिसाला अटक

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

पिंपरी-चिंचवड : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पिंपरी-चिंचवड पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत (Police Recruitment Written Exam) गैरप्रकार (Pune Crime) करणाऱ्या परीक्षार्थी आणि संबधित पोलीस कॉन्स्टेबलला पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. येथील पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत परीक्षार्थीने मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस लावून परीक्षा केंद्रावर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या परीक्षार्थीला औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यातील मदत करणाऱ्या कॉन्स्टेबलवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi) औरंगाबाद (Aurangabad) येथून संबंधी पोलीस कॉन्स्टेबल आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. राहुल उत्तम गायकवाड (Rahul Uttam Gaikwad) (वय 33, रा. मिल कॉर्नर, पोलीस वसाहत) असे अटक केलेल्या पोलिसाचे नाव आहे. गणेश रामभाऊ वैद्य (Ganesh Rambhau Vaidya) (वय 25, रा. धोंदलगाव, ता. वैजापूर) असं अटक (Arrested) केलेल्या परिक्षार्थीचे नाव आहे. (Pune Crime)

याबाबत अधिक माहितीप्रमाणे, 19 नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवड पोलीस दलातील शिपाई पदाच्या 720 जागांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली.
हिंजवडी येथील एका परीक्षा केंद्रावर गणेश वैद्य याचा नंबर आला होता.
सर्व परीक्षार्थींना तपासून परीक्षा केंद्रावर सोडत असताना पोलीस नाईक शशिकांत देवकांत (Police Naik Shashikant Devkant) यांच्या एक परीक्षार्थी निदर्शनास आला. त्या परीक्षार्थीच्या चेहऱ्यावर असलेला मास्क मोठा आणि जाड असल्याने पोलिसांनी त्याला हटकले. परंतु, आपले ओळखपत्र बॅगेत विसरले असल्याचं सांगून परीक्षार्थी वैद्य तिथून पळाला. त्यावेळी पोलिसांनी त्याचा मास्क ताब्यात घेतला. त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याने तेथून पळ काढला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

दरम्यान, गणेश वैद्य याच्या मास्कमध्ये एक सिमकार्ड, बॅटरी आणि इतर तांत्रिक साहित्य सापडले.
याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) गुन्हा दाखल केला गेला आहे.
यानंतर पोलिस तपासात पोलीस कॉन्स्टेबल राहुल गायकवाड (Rahul Gaikwad) हा वैद्यला मदत करणार असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर त्या दोघांना अटक (Arrested) करण्यात आली आहे.

Web Title :- Pune Crime | pimpri chinchwad police recruitment examination aurangabad police arrested in mask copy case

हे देखील वाचा :

Mohammad Huraira | शोएब मलिकच्या सावत्र भावाच्या मुलांनं पाकिस्तान क्रिकेटमध्ये घातली धूमाकूळ, पाहा कोण आहे ‘हा’ खेळाडू?

Ravichandran Ashwin | शास्त्रींवर संताप, अश्विनच्या वक्तव्याने टीम इंडियातील गोंधळ वाढणार का?

Janseva Foundation Katraj | पुण्याच्या कात्रज येथील जनसेवा फौंडेशनने केला निराधार मुलीचा विवाह

Related Posts