IMPIMP

Pune Crime | पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून मध्यरात्री जुगार अड्डयावर छापा ! 27 जणांवर कारवाई तर हुक्क्यासह 12.5 लाखाचा मुद्देमाल जप्त

by nagesh
Pune Crime | Crime Branch raids address club, 12 people detained

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुणे शहरात हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीत खुलेआम सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर (gambling den) आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या (economic offences wing) पथकाने छापा टाकला. या कारवाईत तब्बल 27 जणांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी या कारवाईत दुचाकी, चारचाकी आणि हुक्क्याच्या (Hookah) सामानासह 12 लाख 43 हजार 281 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि.26) रात्री बाराच्या सुमारास हडपसर-माळवाडी येथील सुनिल उर्फ नटराज अशोक तुपे याच्या मालकीच्या पत्रा शेडमध्ये करण्यात आली.

माळवाडी परिसरात 13 पानी रमीचा जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून 2 दुचाकी, चारचाकी, जुगाराचे साहित्य, मोबाईल, रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच याठिकाणी अवैधरित्या हुक्का पार्लर सुरु होते. पोलिसांनी हक्क्याचे सामान जप्त केले आहे. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील उत्तम नेवसे (API Swapnil Uttam Nevse) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वप्नील नेवसे यांच्या फिर्यादीवरुन पोलीसंनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा तसेच COTPA अॅक्ट अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

यांच्यावर गुन्हा दाखल

जुगार अड्डा चालक गणेश जायगुडे, जुगार खेळणार दिपकुमार रावत (वय-26 रा. हडपसर), अमितकुमार सिंग (वय-31 रा. हडपसर), चिरंजीव कुमार जयप्रकाश सिंग (वय-31 रा. एपी रोड, संग्राम हॉटेलमागे, हडपसर) गणेश रामा जाधव (वय-32 रा. पांढरेमळा, हडपसर), अतुल दत्तात्रय लकडे (वय-33 रा. चौफुला, बोरी पारधी, पुणे), अजिंक्य देवीदास शिंदे (वय-30 रा. काळेपडळ, हडपसर), डब्ल्युसिंग दिव्यांकसिंग (वय-26 रा. कामठे वस्ती, हडपसर), निलेश राजेंद्र हिवाळे (वय-40 रा. अमर ज्योती मेगासेंटर, हडपसर), शिवप्रसाद बासुरगन नायर (वय-43 रा. ससाणेगर, हडपसर), सचिन उत्तम माने (वय-38 रा. तांदळेवाडी, बारमती), विक्रम शिवाजी मगर (वय-42 रा. मगरपट्टा, हडपसर), निवृत्ती ज्ञानोबा तुपे (वय-62 रा. साडेसतरा नळी, हडपसर), अफजल मगदुम शेख (वय-43 रा. कोंढवा खुर्द),

संतोष मगंलामाहतो रावत (वय-30 रा. हडपसर), सुधीर बिनदेश्वर राऊत (वय-51 रा. साडेसतरा नळी, गोसावी वस्ती, हडपसर),
गणेश पांडुरंग जाधव (वय-45 रा. केडगाव, दौंड), सुनिल उर्फ नटराज अशोक तुपे (वय-38 रा. हडपसर),
अक्षय परशुराम भंडारी (वय-27 रा. साडेसतरा नळी, हडपसर), वैभव विकास गव्हाणे (वय-26 रा. साडेसतरा नळी, हडपसर),
प्रथमेश रमेश बोरकर (वय-33 रा. माळवाडी, हडपसर), अजिंक्य प्रकाश तुपे (वय-25 रा. हडपसर),
हर्षल लक्ष्मण आखाडे (वय-24 रा. हडपसर), हुसेन आयुब शेख (रा. विश्रांतवाडी, धानोरी रोड, शांतीबन सोसायटी, पुणे),
उत्तम जोगेंदर सिंग (वय-32 रा. माळवाडी, हडपसर), मुकेश कुमार यादव (वय-28 रा. हडपसर), सुनिल काळु रावत (वय-30 रा. डी.पी. रोड, हडपसर).

Web Title : Pune Crime | Pune Economic Crimes Branch raids gambling dens at midnight! Action was taken against 27 persons and 12.5 lakh items including hookahs were seized

हे देखील वाचा :

EPFO | ‘पीएफ’च्या खातेधारकांनी व्हावे सावध, 4 दिवसात केले नाही ‘हे’ काम तर होईल मोठे नुकसान; जाणून घ्या

Pension | फक्त 55 रुपये खर्च करून व्हाल मालामाल, दर महिना मिळेल 3000 रुपयांची पेन्शन; तात्काळ करा रजिस्ट्रेशन

Income Tax Return | ITR न भरल्याने तुम्हाला द्यावा लागतोय जास्त TDS? मग जाणून घ्या ही समस्या कशी सोडवावी?

Related Posts