IMPIMP

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार निलेश उर्फ पिन्या साळवे व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 81 वी कारवाई

by nagesh
Pune Crime | MCOCA on the Asif Khan gang of Kondhawa; Pune Police Commissioner Amitabh Gupta's 114th MCOCA action to date

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन – पुणे शहरातील गुन्हेगारावर (Pune Crime) आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्याकडून गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई (MCOCA Action) Mokka करण्यात येत आहे. पुण्यातील (Pune Crime) येरवडा पोलीस ठाण्याच्या (Yerwada Police Station) हद्दीत दहशत पसरवणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपी निलेश उर्फ पिन्या संजय साळवे (Nilesh alias Pinya Sanjay Salve) याच्यासह त्याच्या तीन साथिदारांवर पुणे पोलीस (Pune Police) आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली. आहे. आयुक्तांनी आजपर्यंत 81 आणि चालु वर्षात 18 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

टोळी प्रमुख निलेश उर्फ पिन्या संजय साळवे (वय – 21 रा. यशवंतनगर, येरवडा), टोळी सदस्य आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार ओमकार उर्फ डब्या विनोद जगधने Omkar alias Dabya Vinod Jagadhane (वय – 21 सर्वे नं 103, यशवंत नगर, येरवडा), निखिल उर्फ पप्या संजय साळवे Nikhil alias Papya Sanjay Salve (वय – 20 रा. यशवंतनगर, येरवडा) आणि एका विधीसंघर्षीत बालक (वय – 16 रा. भोसले वस्ती, येरवडा) यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (Pune Crime)

आरोपी निलेश साळवे आणि त्याच्या 3 साथीदारांवर येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न (Attempt To Murder), जबरी चोरी (Robbery), घरफोडी (House Breaking), मालमत्ते विषयक जाळपोळ (Property Offences), बेकायदा शस्त्र बाळगणे (Illegal Weapon), तसेच लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने दहशत निर्माण करणे अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांनी पुन्हा गुन्हे केले आहेत.

आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचा प्रस्ताव येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख (Senior Police Inspector Yunus Shaikh) यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan) यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मंजूरी दिल्याने आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग किशोर जाधव (ACP Kishor Jadhav) करीत आहेत.

आयुक्तांची 81 वी मोक्का कारवाई

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत.
शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 81 तर चालु वर्षात 18 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Jt CP Joint Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 रोहीदास पवार,
सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख, पोलीस निरीक्षक गुन्हे उत्तम चक्रे (Police Inspector Uttam Chakre) यांनी केली.

Web Title :- Pune Crime | Pune Police Commissioner Amitabh Gupta Take 81st action Of MCOCA till date

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Maharashtra Govt Job Vacant Seats | राज्यात तब्बल दोन लाख 44 हजार सरकारी पदे रिक्त; माहिती अधिकारातून आकडेवारी समोर

Sukanya Samriddhi Yojana (SSY) | सुकन्या समृद्धी योजनेत मोदी सरकारने केले ‘हे’ 5 मोठे बदल; जाणून घ्या

Related Posts