IMPIMP

Pune Crime | मोक्का गुन्ह्यात फरार असलेल्या बडतर्फ पोलिस शैलेश जगतापच्या पुतण्याला गुन्हे शाखेकडून मध्यरात्री अटक

by Team Deccan Express
Pune Crime News | Bundagarden Police arrests inn vehicle thief, seizes autorickshaw, motorcycle

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | बांधकाम व्यावसायिकाची (Builder In Pune) जमिनीच्या व्यवहारात लाखो रुपयांची फसवणूक (Fraud Case) आणि खंडणी (Ransom Case) प्रकरणी बडतर्फ पोलीस शैलेश जगताप (Shailesh Jagtap) याचा पुतण्या (Nephew) जयेश जितेंद्र जगताप (Jayesh Jitendra Jagtap) याला गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक क्रमांक 1 च्या (Anti-Robbery and Anti-Vehicle Theft Squad Pune) पोलिसांनी (Pune Police) रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी जयेश जगताप हा मोक्का कारवाई (MCOCA Action) Mokka झाल्यानंतर फरार (Pune Crime) झाला होता.

आरोपी जयेश जितेंद्र जगताप (वय – 21 रा. घोरपडे पेठ, पोस्ट ऑफिस जवळ पुणे) याच्यावर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi Police Station) IPC 420, 406, 506 (2), 386, 387, 388, 389, 120 (ब), 109, 34 गुन्हा दाखल करुन महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई करण्यात आली होती. फरार आरोपीला रविवारी (दि.29) एकच्या सुमारास मार्केट यार्ड (Market Yard) येथील गंगाधाम चौपाटी (Gangadham Chowpatty) येथून अटक (Arrest) करण्यात आली. (Pune Crime)

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकचे पोलीस शिपाई सुमित ताकपेरे (Police Constable Sumit Takpere) यांना चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी जयेश जगताप हा मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौपाटी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता आरोपी दाखल गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीला चतु: श्रृंगी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम (Senior Police Inspector Rajendra Kadam),
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेख, पोलीस हवालदार शिवतरे, ताकपेरे यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Dismissed Police Shailesh Jagtap Nephew Jayesh Jitendra Jagtap In Ransom Case MCOCA Mokka Case

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts